गुहागर : काही वैयक्तिक व व्यवसायिक अडचणीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गुहागर विधानसभा मतदार संघाचे क्षेत्र उपाध्यक्ष दीपक जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या कडे दिला आहे.
Due to some personal and business difficulties, NCP’s Guhagar Assembly constituency vice-president Deepak Jadhav has tendered his resignation to district president Babaji Jadhav.
या पत्रात म्हटले आहे की, गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकनिष्ठ राहून काम करत असताना तालुक्यातील तमाम जनतेचं सहकार्य मिळालं. तसेच पक्षाने मला हे पद दिले. त्याबद्दल मी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा मी आभारी आहे. आजपर्यंत पक्षासाठी तालुका तसेच जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने जीव ओतून काम केले, यापुढेही पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षासाठी काम करीत राहीन याबद्दल खात्री देतो. मी पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्यावर नाराजी नसून हा निर्णय माझा वैयक्तिक आहे. तरी माझा सदर राजीनामा लवकरात लवकर स्विकारावा, अशी विनंती दीपक जाधव यांनी पत्रातून केली आहे.