महाविद्यालयातील इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी विभागातर्फे आयोजन
गुहागर, ता. 05 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर (Maharshi Parashuram College of Engineering, Velneshwar) मध्ये दिनांक २५ व २६ मार्च २०२२ या दोन दिवसीय कालावधीत ‘राष्ट्रीय विज्ञान परिषद’ घेण्यात आली. एकूण २० हून अधिक तज्ञ व्याख्यातांनी सहभाग घेऊन विविध विषयावर आपली मते उपस्थितांसमोर मांडली. National Science Council in Velneshwar


महाविद्यालयातील इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी विभागातर्फे ही विज्ञान परिषद आयोजित केली गेली. ‘Role of Science Communicators in enhancing public engagement with Science & Technology’ या विषयावर ही विज्ञान परिषद घेण्यात आली होती. यामध्ये एकूण २० हून अधिक तज्ञ व्याख्यातांनी सहभाग घेऊन विविध विषयावर आपली मते उपस्थितांसमोर मांडली. या परिषदेसाठी १०० हून अधिक प्रशिक्षणार्थिनी सहभाग नोंदविला. National Science Council in Velneshwar


सदर राष्ट्रीय विज्ञान परिषदेसाठी श्री.राजीव गोयल, डॉ.बाळ फोंडके, डॉ.सुधाकर आगरकर, श्री. एस. के. मल्होत्रा, डॉ. बी. बी. शर्मा, श्री. विठ्ठल नाडकर्णी, डॉ. सुनिल भागवत, डॉ. नरेंद्र शहा, श्री. शैलेश मलोडे, डॉ. चंद्रशेखर मराठे, श्री. शिवप्रसाद खेनेद, प्रा. द्वैता पाटील, डॉ. सुनिल पाटील, डॉ. श्याम जोशी, डॉ. अरविंद रानडे, डॉ. बी. एन. जगताप, श्री. जयंत कयाल, डॉ. सिद्धीविनायक बर्वे, श्री. जी. पी. कोठीयाल इत्यादी तज्ञ व्याख्यांतांचा समावेश होता. National Science Council in Velneshwar

