National Mathematics Day in MPCOE
गुहागर : गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय गणित दिनानिमित्त ई-वेबिनार संपन्न झाले.
विद्या प्रसारक मंडळ, ठाणे संचालित महर्षी परशुराम अभियांत्रिकीच्या Applied Sciences & Humanities विभागातर्फे दि. २२ डिसेंबर रोजी “राष्ट्रीय गणित दिनाचे ” औचित्य साधून ई-वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या ई-वेबिनारचा मुख्य उदेश हा विद्यार्थी, शिक्षक व संशोधक यांच्यामध्ये गणित या विषयामध्ये घडणाऱ्या नवनवीन संशोधनाची व त्याच्या वापराची माहिती करून देणे हा होता. National Mathematics Day in MPCOE
या वेबिनारला आर. पी. गोगटे महाविद्यालय रत्नागिरी मधील गणित विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. राजीव सप्रे व्याख्याते म्हणून लाभले. तसेच व्याख्याते विद्या प्रसारक मंडळ ऍडव्हान्स स्टडी सेंटर ठाणेचे डॉ. सुधाकर आगरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
डॉ . सप्रे यांनी Fuzzy Mathematics आणि त्याचे व्यवहार उपयोग या विषयावर व्याख्यान दिले. यात त्यांनी प्रामुख्याने Fuzzy Mathematics हे Air Conditioners , Vacuum Cleaners व Transmission Systems या क्षेत्रात कशाप्रकारे वापरले जाते हे काही उदाहरणांच्या सहाय्याने समजावून दिले. तसेच डॉ. आगरकर यांनी रामानुजन अमृत भारत गणित यात्रामध्ये तीन दिवस सहभाग नोंदवला होता. त्यात त्यांना आलेले अनुभव उपस्थितांना ऐकवले. National Mathematics Day in MPCOE
या ई-वेबिनार साठी शंभरहून अधिक विज्ञान व गणित क्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी, शिक्षक, व संशोधकांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक सहभागी सदस्याला महाविद्यालयातर्फे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच एका Online quiz चे सुध्दा आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकुण 65 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. National Mathematics Day in MPCOE
या कार्यक्रमाच्या आयोजन समितीमध्ये असलेल्या डॉ. अमित माने (विभागप्रमुख), श्री. औदुंबर पाटकर, श्री. गणेश दिवे, श्री. रोहन गोंधळेकर (समन्वयक), श्री. अरुण सरगर (समन्वयक), श्री. संभाजी लोहार यांचा समावेश होता. National Mathematics Day in MPCOE