गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय ई-परिषद संपन्न झाली. विद्या प्रसारक मंडळ, ठाणे संचालित महर्षी परशुराम अभियांत्रिकीच्या Applied Sciences & Humanities विभागातर्फे शनिवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२१ रोजी “Advanced Materials and Applications (AMA-2021)” या राष्ट्रीय ई-परिषदेचे आयोजन करण्यात आले.
National e-conference was held at Maharshi Parashuram Engineering College, Applied Sciences & Humanities National E-Conference “Advanced Materials and Applications (AMA-2021)” was organized on Saturday, October 23, 2021 by Maharshi Parashuram Engineering Department, Vidya Prasarak Mandal, Thane.
या ई-परिषदेचा मुख्य उदेश हा विद्यार्थी, शिक्षक, संशोधक व उद्योजक यांच्यामध्ये Advanced Materials या क्षेत्रामध्ये घडणाऱ्या नवनवीन संशोधनाची व त्याच्या वापराची माहिती करून देणे हा होता. या परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रो. एस. बी. देवसरकर मुख्य अतिथी म्हणून लाभले. तसेच या परिषदेमध्ये तज्ञ म्हणून प्रो. विकास पाटील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व प्रो. एल. एन. सिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या राष्ट्रीय ई-परिषदेसाठी शंभरहून अधिक विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी, शिक्षक, संशोधक व उद्योजकांनी सहभाग नोंदवला. या परिषदेतील प्रत्येक सहभागी सदस्याला महाविद्यालया तर्फे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच अनेक संशोधकांनी केलेल्या संशोधन कार्याचे प्रकाशन आंतरराष्ट्रीय नियतकालीकेमध्ये करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजन समितीमध्ये असलेल्या डॉ. अमित माने (संयोजक), श्री. औदुंबर पाटकर (सह-संयोजक), श्री. गणेश दिवे, श्री. रोहन गोंधळेकर, श्री. अरुण सरगर, श्री. दिपक जाधव, श्री. संभाजी लोहार यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.