• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मास्क न वापरणाऱ्यांवर नगरपंचायतीची कारवाई

by Ganesh Dhanawade
November 23, 2020
in Old News
16 0
0
मास्क न वापरणाऱ्यांवर नगरपंचायतीची कारवाई
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सोबत पोलीस असल्याने आज सर्वाधिक दंडवसुली

गुहागर, ता. 23 : येथील नगरपंचायतीने आज मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईचा फटका तरुण, तरुणी आणि काही पर्यटकांनाही बसला. दिवसभरात 16 व्यक्तींकडून दंडापोटी 8 हजार रुपयांची वसुली नगरपंचायतीने केली. गेल्या सहा महिन्यात नगरपंचायतीने 44 मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करून 22 हजार रुपयांचा महसूल गोळा केला आहे.
सोमवारी गुहागरमध्ये प्रशासकीय कामासाठी तालुक्यातून येणार्‍या लोकांची संख्या अधिक असते. त्यामुळे आज अचानक गुहागर नगरपंचायतीने दंडात्मक कारवाईसाठी बाजारपेठेत टीम पाठवली. या टिममध्ये गुहागर नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी महेंद्र पेढामकर, नगरपंचायत कर्मचारी सुनील नवजेकर, ओंकार लोखंडे सहभागी झाले होते. केवळ नगरपंचायतीचे कर्मचारी कारवाईसाठी उभे राहिले की, स्थानिक लोक वाद घालतात. त्यामुळे या कारवाईचे वेळी एक पोलीस शिपाई द्यावा अशी मागणी नगरपंचायतीने गुहागर पोलीस ठाण्याकडे केली होती. ती मागणी मान्य करत पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी नगरपंचायतीच्या टीमला सहकार्य करण्यासाठी  पोलीस कॉन्स्टेबल वागतकर यांची नियुक्ती केली. पंचायत समिती कार्यालय, बाजारपेठ, एस.टी. बसस्थानक आदी .ठिकाणी उभे राहून मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीला पकडून दंड वसूल करण्याचे काम ही टीम करीत होती. सोबत पोलीस असल्याचे परिणाम आज पहायला मिळाला. आजपर्यंत नगरपंचायतीच्या टिमला न जुमानता लोक पळून जात असतं. मात्र आज पोलीस असल्याने 16 व्यक्तींकडून 8 हजार रुपयांचा दंड या टीमने वसूल केला.
या कारवाई संदर्भात बोलताना महेंद्र पेढामकर म्हणाले की, पर्यटकांवर कारवाई करताना दु:ख झाले. कारण पर्यटक फिरायला येतात. समुद्रस्नानासाठी जाताना मास्क घेऊन जात नाहीत. काही पर्यटकांना आम्ही मास्क वापरा अशी सूचना केली. कारण गुहागरमध्ये पर्यटन व्यवसाय वाढला पाहिजे ही आमचीही इच्छा आहे. इथे आलेला पर्यटक केवळ कारवाईची आठवण ठेवून गेलेला आम्हांलाही चालणार नाही. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनीच पर्यटकांना मास्क वापरण्यासंदर्भात आग्रहाची विनंती केली तर अधिक चांगले होईल. गुहागरमध्ये पुन्हा कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी सर्वांनीच सहकार्य केले तर अशी कारवाई करावी लागणार नाही.

Tags: CoronaCorona In GuhagarGuhagarGuhagar NagarpanchyatGuhagar NewsLocal NewsMarathi NewsMaskNews in GuhagarTop newsTourismकोरोनागुहागरगुहागर नगरपंचायतगुहागर न्युजगुहागरातील कोरोनाटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यामास्कलोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.