गुहागर : माझी रत्नागिरी माझी जबादारी अंतर्गत कोविड 19 सर्वेक्षण पथकामार्फत तळवली गावात सर्वेक्षण मंगळवार आजपासून सुरू झाले आहे.
My Ratnagiri my responsibility Survey through Covid 19 survey team under starts from today in Talwali village.
सद्या तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तळवली परिसरातदेखील काही रुग्ण आढळून आल्याने खबरदारी म्हणून ग्रामपंचायत व ग्रामकृतीदल व वाडी कृतीदलाकडून वाडीस्तरावर भेटी देऊन कोरोनाबाबत जनजागृतीचे व खबरदारी घेण्याचे वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. तसेच माझी रत्नागिरी माझी जबाबदारी अंतर्गत सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून दि.1 ते 15 मे पर्यंत ही मोहीम राबविण्यात येत आहे. तळवली गावात एकूण तीन वॉर्ड असून वॉर्ड प्रमाणे तीन गट करण्यात आले आहेत. यामध्ये शिक्षक, आशा सेविका, ग्रामपंचायत सदस्य, वाडी कृतीदल सदस्य ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी हे प्रत्येक कुटुंबाला भेटी देऊन प्रत्येकाची ऑक्सीजन लेवल व तापमान चेक करणार आहेत. यावेळी पर्यवेकक्षिका सौ हळये मॅडम हजर होत्या. तरी सर्व ग्रामस्थांनी या सर्वेक्षणाला सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायत तळवलीच्यावतीने करण्यात आले आहे.