• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहीम परिणामकारकपणे राबवा

by Mayuresh Patnakar
September 15, 2020
in Old News
18 0
0
CM VC
35
SHARES
100
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन; कोरोनाविरुद्धचा लढा आता घरोघर पोचवा

जनसंपर्क कक्ष,  मुख्यमंत्री सचिवालय द्वारा प्रसारित
मुंबई : कोरोनाविरुद्धचा लढा आपण आता घराघरात पोचवत असून आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करायची आहे. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. आज वर्षा येथून राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे  (व्हिडिओ कॉन्फरन्सींग) संवाद साधला. 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना विरुध्दचा लढा गेले 5 ते 6 महिने आपण देत आहोत. राज्यातील सर्व यंत्रणा अहोरात्र मेहनत करीत आहे. आवश्यकतेप्रमाणे सुविधांची उभारणी आपण करत आहोत. मात्र आपले आव्हान अजून संपले नाही. लॉकडाऊन काळात ही लाट थोपविली होती. आता हळूहळू सर्व व्यवहार खुले करीत आहोत. आणखीही काही गोष्टी सुरू करण्याची मागणी अनेकजण करीत आहेत. आज काही लाख परप्रांतीय मजूर परत राज्यात आले आहेत. एकूणच कोरोनाची वाढती संख्या पाहता कोरोनासोबत कसे जगायचे ते आता शिकवावेच लागणार आहे. त्यासाठीच माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम आपण सुरु करत आहोत. रोग होऊच न देणे हा मंत्र महत्वाचा आहे. त्यामुळे आपली आरोग्य पथके घरोघरी भेट देऊन सूचना सांगतील. पुढील काळात आपल्याला दक्षता समित्या देखील कायमस्वरूपी ठेवाव्या लागतील.  2014 मध्ये मी शिवआरोग्य योजनेत टेलिमेडिसीनचे प्रात्यक्षिक दाखविले होते. यापुढील काळात आपल्याला वैद्यकीय उपचार किंवा तपासणीमध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करावा लागेल. ही मोहीम परिणामकारक होणे गरजेचे आहे. तसे झाले तर कोरोनाविरुद्धचा लढा आपण जिंकू.

ऑक्सिजनचे पुरेसे उत्पादन – प्रधान सचिव आरोग्य डॉ. व्यास
सध्या राज्यात 1000 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन होते मात्र गरज 500 मेट्रिक टन इतकी आहे. सध्याचे उत्पादन पुरेसे असले तरी भविष्यात गरज वाढणार आहे. असे प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले. व्यास म्हणाले की, जिल्ह्यांनी त्यांना लागणारी ऑक्सिजनची मागणी व्यवस्थित आणि पाहिजे तेवढीच नोंदवावी. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष यासाठी सुरू करण्यात आला असून त्यांच्या संपर्कात राहावे. ऑक्सिजनचा नेमका कियी उपयोग केला जातोय त्याचे दररोज ऑडिट करावे व अपव्यय टाळावा.

ऑक्सिजन टँकर्सना प्रतिबंध नाही – मुख्य सचिव आशिष कुमार सिंह
ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकर्सना आपत्कालीन वाहनांचा दर्जा देण्याचा निर्णय झाला असून त्यावर सायरन असतील . या टँकसची वाहतुक रोखू नये. तसेच दिवसादेखील त्यांची वाहतूक शहरांत सुरू राहील असे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी माहिती दिली

मोबाईल ॲप देखील विकसित – राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक रामास्वामी
या मोहिमेसाठी खास मोबाईल ॲप विकसित करण्यात आले. ते सर्वसामान्य नागरिकांसाठी नाही. आरोग्य पथकांना दैनंदिन अहवाल नोंदविण्यासाठी आहे . यातून समोर येणाऱ्या माहितीद्वारे योग्य रीतीने व जलदरीत्या विश्लेषण शक्य होईल. अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक रामास्वामी यांनी दिली. 

या मोहिमेसाठी सर्व पथकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. तसेच ॲपसह आवश्यक प्रसिद्धी साहित्य जिल्ह्यांना देण्यात आल्याचे देखील बैठकीत सांगण्यात आले. सर्व विभागीय आयुक्तांनी आपापल्या विभागांमध्ये या मोहिमेची कशी तयारी सुरू आहे त्याची माहिती दिली. या व्हिडिओ कॉन्फरन्सींग मिटींगमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव  विकास खारगे, प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव सौरव विजय, राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक रामस्वामी, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल आदी उपस्थित होते.

Tags: CM Udhav ThakareyGuhagarGuhagar NewsMahahrashtra CMMarathi NewsNews in Guhagarउद्धव ठाकरेटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यामाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिममुख्यमंत्री महाराष्ट्रलोकल न्युज
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.