गुहागर, ता. 10 : आफ्रोह (OFROH) महिला आघाडी, रत्नागिरीचा हळदी कुंकू कार्यक्रम व संघटनेची विशेष सभा (Special Meeting) नुकतीच देवरूख येथे पार पडली. या सभेत रत्नागिरी जिल्हा महिला आघाडीची नवीन कार्यकारिणी घोषीत करण्यात आली. त्यामध्ये आफ्रोह महिला आघाडीच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सौ. उषा पारशे यांच्यासह उपाध्यक्षपदी सौ. नंदा डांगरे (राणे), सचिव – सुनंदा रामदास फुकट व सहसचिव कु. सुनंदा विलास देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. Mrs. Parshe is District President of Ofroh


महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सौ. उषा पारशे, उपाध्यक्ष नंदा डोंगरे (राणे), सचिव सौ. सुनंदा फुकट व सहसचिव कु. सुनंदा देशमुख यांचा शाल व श्रीफळ देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ज्यांनी विलास देशमुख यांच्या अधिसंख्य पदाची ऑर्डर मिळविण्यासाठी खांद्याला खांदा लावून 5 जुलै ते 14 जुलै 2021 या कालावधीत रत्नागिरी कलेक्टर ऑफीसच्या समोर ‘ऑफ्रोह’ च्या माध्यमातून साखळी उपोषण केलं. त्या विलास देशमुख यांच्या सहचारिणी सौ. शिला विलास देशमुख यांचाही साडी, शाल व श्रीफळ देवून विशेष सत्कार व सन्मान करण्यात आला. Mrs. Parshe is District President of Ofroh
नूतन कार्यकारणीचे अभिनंदन करताना माजी जिल्हाध्यक्ष सौ. माधुरी घावट म्हणाल्या की, मी तुमच्या कायम सोबत आहे. आपण सौ. पारशे यांना अध्यक्ष पद दिलंय. जसं आतापर्यंत मला सहकार्य केलं तसंच सहकार्य नवीन अध्यक्ष सौ. पारशे यांना करू या. आपली महिला आघाडी मजबूत आहे, तशीच मजबूत ठेवूया. असे आवाहन यावेळी सौ. घावट यांनी केले. Mrs. Parshe is District President of Ofroh


आफ्रोह (OFROH) महिला आघाडीच्या नुतन जिल्हाध्यक्ष सौ. उषा पारशे म्हणाल्या की, आफ्रोह व महिला आघाडीसाठी जेवढा वेळ देता येईल, कार्य करता येईल तेवढं मी प्रामाणिकपणे करेन. Mrs. Parshe is District President of Ofroh यावेळी आफ्रोह (OFROH) महिला आघाडी राज्य उपाध्यक्ष माधुरी मेनकार, माजी जिल्हाध्यक्ष सौ. माधुरी घावट, नंदा राणे, प्रतिभा रोडे, मंगला रोडे, शिला देशमुख, अर्चना उमरेडकर, सुनंदा देशमुख व इतर महिला उपस्थित होत्या. Mrs. Parshe is District President of Ofroh
महिला आघाडीच्या नुतन सर्व पदाधिकारी यांचे राज्य कार्यकारिणी सदस्य व प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर, सचिव बापुराव रोडे, कोषाध्यक्ष किशोर रोडे यांनी अभिनंदन केले आहे. Mrs. Parshe is District President of Ofroh