ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत अविनाश फायटर उपविजेता
गुहागर : येथील मारुती छाया क्रिकेट संघ, खालचापाट यांच्यावतीने सात संघांच्या आयोजित एमपीएल ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत गणराज वॉरियर्स विजेता ठरला. तर अविनाश फायटर संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. MPL Tournament
या स्पर्धेचे उद्घाटन किरण कला मंडळाचे अध्यक्ष उदय लोखंडे, मारुती छाया क्रिकेट संघाचे माजी खेळाडू सुनील रेवाले, प्रवीण घाडे यांच्या हस्ते फीत कापून झाले. स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या मैदानाचे (पीच) उद्घाटन चंद्रशेखर लोखंडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. तर विजय धनावडे, महेश रेवाळे, नरेश कुळे यांनी यष्टीला बांधलेल्या फीत सोडून स्पर्धेतील पहिल्या सामन्याचा शुभारंभ केला. MPL Tournament
आयपीएलच्या धर्तीवर गणराज वॉरियर्स, जी. डी. वॉरियर्स, अविनाश फायटर, ओम साई स्पोर्ट क्लब, पपू स्पोर्ट, संजय स्पोर्ट, एस लायन्स या संघांमध्ये प्राथमिक फेरीचे सामने साखळी पद्धतीने खेळविण्यात आले.
उपांत्य फेरीत अविनाश फायटरने पपू स्पोर्ट संघावर मात करून, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत गणराज वॉरियर्स संघाने पपू स्पोर्ट संघावर एकतर्फे विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात गणराज वॉरियर्स प्रथम फलंदाजी करताना तीन षटकात २५ धावांचे आव्हान दिले होते. अविनाश फायटरचा संघ हे आव्हान पेलू न शकल्याने गणराज वॉरियर्स संघ विजेता ठरला. या स्पर्धेतील अंतिम सामन्यातील सामनावीर अक्षय लोखंडे, मालिकावीर धनंजय लोखंडे (गणराज वॉरियर्स), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साहिल रेवाळे, गोलंदाज अमरदिप जाधव, फलंदाज पुष्कर शिंदे (अविनाश फायटर) यांची निवड करण्यात आली. MPL Tournament
बक्षीस वितरण कार्यक्रमास किरण कला अध्यक्ष उदय लोखंडे, रवींद्र विखारे, दतात्रय रेवाले, प्रकाश गोयथळे सुनील गोयथळे, राजेंद्र धनावडे, गणेश धनावडे, अमरदीप जाधव, रोहन विखारे, चंद्रशेखर लोखंडे, विजय धनावडे, शैलेश उदेक, धनंजय लोखंडे, सिद्धार्थ वराडकर, निलेश लोखंडे, शुभम शेटे, पुष्कर शिंदे, शुभम चव्हाण, साहिल लोखंडे, महेश बेंडल, दीपक जाधव, विजय जाधव, राज डोर्लेकर आदींसह अन्य सदस्य उपस्थित होते. MPL Tournament