गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, मनसे सरचिटणीस डॉ. मनोज चव्हाण, रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस संदिप फडकले व तालुका अध्यक्ष विनोद जानवलकर यांच्या विशेष प्रयत्नाने गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर- वाडदई, जानवळे, तळवली, चिंद्रावळे आदी ग्रामपंचायतींना सॅनिटायझर व पीपीई किटचे वितरण करण्यात आले.
Maharashtra Navnirman Sena’s Maharashtra State General Secretary Vaibhav Khedekar, MNS General Secretary Dr. Manoj Chavan, Ratnagiri District General Secretary Sandeep Phadkale and Taluka President Vinod Janwalkar due to their special efforts. Sanitizers and PPE kits were distributed to Gram Panchayats like Velneshwar-Waddai, Janwale, Talwali, Chindrawale in Guhagar taluka.
या कार्यक्रमाला मनसेचे सहसंपर्क अध्यक्ष राजेंद्र गडदे, तेजस पोफळे, किरण गडदे, सिद्धेश सूर्वे, संजय भुवड, प्रीतम सुर्वे रुपेश घवाळे, कौस्तुभ कोपरकर, दिनेश निवाते, संकेत खांबे, वेळणेश्वर ग्रामपंचायतचे सरपंच चैतन्य धोपावकर, सदस्य नितीन पोळेकर, सुप्रिया उदय आरवलकर, उदय आरवलकर, प्रविण कनगुटकर आदी उपस्थित होते.
वेळणेश्वर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पार पडलेल्या वितरण कार्यक्रमात सरपंच चैतन्य धोपावकर म्हणाले, कोरोना काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक समाजपयोगी कामे केली आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ग्रामपंचायतींना सॅनिटायझर व पी.पी.ई. किटचे वितरण केल्याबद्दल आभार मानले.