सार्वजनिक बांधकाम उपविभागाला दिला आंदोलनाचा इशारा
गुहागर : तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेल्या अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच गुहागर वेलदूर या मुख्य मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. एसटी स्टँड ते बाग दरम्यान रस्त्याची बिकट अवस्था आहे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दगड माती टाकून तात्पुरतती मलमपट्टी करण्यात आली. परंतु केलेली मलमपट्टी भर पावसात वाहून गेली आहे. आता त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच रानवी फाटा ते अंजेनवेल फाटा या रस्त्यावरून सध्या आरजीपीपीएलच्या ब्रेक वॉटर चे काम सुरू असल्याने मोठ मोठे दगड वाहतूक या रस्त्यावरुन होत आहे. सतत वाहतूक होत असल्याने या ठिकाणची रस्त्याची अवस्था फार बिकट झाली आहे. या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा मनसेला आंदोलनाचा तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी दिला आहे.
The road from Ranvi Fata to Anjenvel Fata is currently undergoing RGPPL’s breakwater work and a large amount of stone is being transported on this road. The road condition of this place is very bad due to continuous traffic.
यावेळी तालुकाध्यक्ष जानवळकर यांनी तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. रस्ते बांधताना ठेकेदारांनी बांधकाम खात्याला न विचारता रस्ते बांधले का? असा सवाल अधिकाऱ्यांना केला. तसेच बांधकाम खात्याकडून आता ठेकेदारांवर कारवाई करायची भाषा केली जात आहे. पण हे फक्त दोन दिवसांची नाटकं आहेत. मीडियासाठी हे सगळं बोललं जात आहे. ठेकेदारांना रस्त्याची काम देता मग आधीच चांगले रस्ते करून का घेत नाहीत. अधिकारी याचे ठेकेदार यांच्याबरोबर लागेबांधे असल्यामुळेच गुहागर तालुक्यातील रस्त्यांची ही अवस्था आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्याचे काम ७/८ दिवसात चालू केले नाही, तर मनसे रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला. यावेळी विभाग अध्यक्ष तेजस पोफळे, उपविभाग अध्यक्ष स्वप्निल कांबळे, मयुर शिगवण, कौस्तुभ कोपरकर, नितेश शितप, ऋतिक गावणकर आदी उपस्थित होते.