गुहागर : आमदार श्री. भास्करराव जाधव हे उद्या दि. १ ऑक्टोबर रोजी तालुक्यासाठी दिलेल्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी गुहागरमध्ये येत आहेत. या कार्यक्रमानंतर ते पक्ष कार्यालयात दिवसभर थांबून गुहागर शहाराबरोबरच तालिक्यातील जनतेच्या अडीअडचणी, विकासाचे प्रश्न समजून घेणार आहेत.
कोरोनाचे संकट आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन आमदार जाधव यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून गुहागर तालुक्यासाठी सुसज्ज अशी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण उद्या सकाळी १०.३० वाजता पंचायत समिती कार्यालय, गुहागर येथे त्यांच्याच हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानंतर पंचायत समिती कार्यालायमध्येच पत्रकार परिषद होणार असून त्यानंतर पूर्ण दिवस ते गुहागरमध्ये थांबणार आहेत आणि पक्ष कार्यालयामध्ये कार्यकर्ते व नागरिकांना भेटणार आहेत. कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये मतदारसंघातील जनतेच्या प्रत्येक अडीअडचणी सोडविण्यासाठी आमदार श्री. जाधव हे सदैव कार्यरत होते. या संकटाच्या काळात सामन्यातील सामान्य व्यक्तीसुद्धा त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून त्यांचे प्रश्न मांडत होते आणि त्या सर्वांचे समाधान करण्याचा प्रयत्न आ. श्री. जाधव यांच्याकडून होत होता. कोरोना व लॉकडाऊनच्या काळात मतदारसंघातील असंख्य लोकांना वेगवेगळ्या प्रकारे सहाय्य करून दिलासा देण्याचे काम त्यांनी केले. आ. श्री. जाधव यांनी मतदारसंघात कशाचीही कमतरता पडू दिली नाही. दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणांशी त्यांच्या सतत बैठका, अधिकाऱ्यांना सूचना, पत्रव्यवहार सुरूच होते. परंतु, सतत लोकांमध्ये राहणारे, त्यांचे छोटे-मोठे प्रश्न समजून घेऊन जागेवरच सोडविणारे आ. श्री. जाधव हे कोरोनाच्या संकटामुळे थेट लोकांमध्ये जाता येत नसल्याने काही दिवसांपासून प्रचंड अस्वस्थ होते. अखेर कोरोनाच्या संकटाची पर्वा न करता त्यांनी लोकांच्या गाठीभेटी घेण्याचा निर्णय घेतला. याचाच एक भाग म्हणून उद्याचा पूर्ण दिवस त्यांनी गुहागर तालुक्यातील जनतेसाठी दिला आहे.
