चिपळूण : शहरामध्ये एका परिचरिकेवर हल्ला करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला होता. दोनच दिवसांत या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी आरोपीला अटक केली. या कौतुकास्पद कामगिरीनंतर गुहागर-चिपळूण-खेड मतदारसंघाचे आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी पोलीस ठाण्यात जाऊन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन बारी, पोलीस निरीक्षक श्री. देवेंद्र पोळ आणि या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.
In the city, a nurse was attacked and tried to raping her. Within two days, the police investigated the crime and arrested the accused. After this admirable performance, MLA of Guhagar-Chiplun-Khed constituency Shri. Bhaskarrao Jadhav went to the police station and asked Sub-Divisional Police Officer Shri. Sachin Bari, Inspector of Police Shri. Congratulations to Devendra Pol and his team investigating the crime.
पोलीस निरीक्षक श्री. पोळ यांनी आतापर्यंत अनेक गुन्ह्यांची उकल करून चांगली कामगिरी केल्याचे उद्गारही त्यांनी काढले. अशीच कामगिरी करून गुन्हेगारी नियंत्रणात ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. श्री. बारी, श्री. पोळ यांनी आ. श्री. जाधव यांचे आभार मानताना आपल्यासारख्या व्यक्तींनी केलेल्या कौतुकामुळे आम्हाला निश्चित प्रोत्साहन मिळून मनोधैर्य वाढले आहे, असे उद्गार काढले. यावेळी आ. श्री. जाधव यांच्यासोबत फैयाज शिरळकर, रवींद्र कदम, आल्हाद वरवाटकर आदी उपस्थित होते.