गुहागर : गुहागर शहरातील पत्रकारांना आमदार भास्कर जाधव यांनी ऑक्सिमिटर व पल्समिटर दिले. शिवसेना शहरप्रमुख निलेश मोरे आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित गुहागरच्या संपर्क कार्यालयात या वस्तुंचे वितरण करण्यात आले.
रुग्णवाहिकेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आमदार भास्कर जाधव गुहागरमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. या संवादामध्ये कोरोनामधील बातमीदारीवर चर्चा झाली. त्यावेळी वार्तांकनासाठी होणारा प्रवास, कार्यालयात बातम्या देण्यासाठी येणारी विविध गावातील मंडळी या सगळ्याचा विचार करता आमच्याकडे ऑक्सिमिटर व पल्स मिटर असतील तर व्यक्तिगत तपासणी करणे सोपे होईल. अन्य तालुक्यातील वृत्तपत्र कार्यालयात अशी व्यवस्था आहे. मात्र गुहागरमधील वृत्तपत्र कार्यालयांकडे ऑक्सिमिटर आणि पल्समिटर नाहीत. हा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. त्याची दखल घेत आमदार भास्कर जाधव यांनी गुहागरमधील पत्रकारांना ऑक्सिमिटर व पल्समिटर दिले. सदर वस्तुचे वितरण गुहागरच्या संपर्क कार्यालयात शहरप्रमुख निलेश मोरे, युवासेनेचे उपजिल्हाधिकारी सचिन जाधव, तालुका अधिकारी अमरदीप परचुरे, शहर अधिकारी राकेश साखरकर, गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष जयदेव मोरे, माजी बांधकाम सभापती दीपक कनगुटकर, विनायक जाधव, मनीष मोरे, राजू बागकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.