• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आ. जाधवांनी गुहागरला दिली रुग्णवाहिका

by Ganesh Dhanawade
September 29, 2020
in Old News
16 0
1
आ. जाधवांनी गुहागरला दिली रुग्णवाहिका
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

१ ऑक्टो. रोजी लोकार्पण सोहळा

गुहागर : गुहागर शहर शिवसेनेच्या वतीने गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्करशेठ जाधव यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार गुहागर तालुक्यासाठी आमदार स्थानिक विकास निधी मधून रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली असून १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता गुहागर पंचायत समिती येथे लोकार्पण सोहळा आ. जाधव यांच्या उपस्थितीत होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात रुग्णवाहिका नसल्याने कोविड रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. याबाबत गुहागर शहर शिवसेनेच्या वतीने गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्करशेठ जाधव यांच्याकडे रुग्णवाहिकेची मागणी केली होती. सदर रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आ. भास्करशेठ जाधव यांच्या शुभहस्ते व जिल्हाप्रमुख सचिन कदम, जि.प.उपाध्यक्ष महेश नाटेकर, तालुकाप्रमुख सचिन बाईत, सभापती सौ. विभावरी मुळे, उपसभापती सुनील पवार, सर्व जि.प. सदस्य, पं. स. सदस्य, नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तरी सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि सर्व अंगिकृत संघटना आजी – माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना गुहागर शहरप्रमुख निलेश मोरे यांनी केले आहे.

Tags: CoronaCorona NewsCovid19GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarआमदार भास्कर जाधवकोरोनाटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यारुग्णवाहिकालोकल न्युजविधानसभा मतदारसंघ
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.