अपघात टळणार, सार्वजनिक बांधकामाचा नवा प्रयोग
गुहागर, ता. 25 : Mirrors Mounted on Turns शृंगारतळी आबलोली मार्ग पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या मार्गावर अनेक तीव्र, अवघड वळणांवर अपघात होतात. हे अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) प्रायोगिक तत्त्वावर दोन ठिकाणी मोठे बर्हिगोल आरसे बसवले आहेत. अशाप्रकारचे कॉर्नर आरसे अवघड वळणावर बसवून अपघातापासून संरक्षण करण्याची मागणी भाजप सरचिटणीस सचिन ओक यांनी बांधकाम विभागाकडे केली होती. Mirrors Mounted on Turns
श्रृंगारतळी आबलोली मार्गावरील वेळंब, पांगारी तर्फे वेळंब, कोतळूक, शीर या गावात अवघड आणि तीव्र वळणे आहेत. समोरुन येणारे वाहन दिसत नाही. भातगाव राई पुलाला जोडणारा रस्ता असल्याने गुहागर ते रत्नागिरीसाठी हा जवळचा मार्ग आहे. स्वाभाविकपणे या रस्त्याचा वापर परिसरातील ग्रामस्थांसह पर्यटक, शासकीय अधिकारी कर्मचारी, माल वहातूक करणारी अवजड वाहने मोठ्या संख्येने करत असतात. त्यामुळे वळणांवर होणाऱ्या किरकोळ अपघातांची संख्याही वाढत आहे. हे लक्षात घेवून अवघड वळणांवर कॉर्नर आरसे Mirrors Mounted on Turnsबसवावे. अशी मागणी गुहागर तालुका भाजप सरचिटणीस सचिन ओक यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरच्या उपअभियंता निकम मॅडम यांच्याकडे केली.
आजपर्यंत गुहागरमध्ये असे आरसे सार्वजनिक रस्त्यावर कुठेच बसविलेले नाहीत. त्यामुळे निधी कसा उपलब्ध करायचा. त्या आरशांची सुरक्षितता कशी पहायची. असे अनेक प्रश्र्न होते. तरीदेखील प्रायोगिक तत्त्वावर दोन तीन ठिकाणे आरसे बसवुया. असा निर्णय सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरचे उपअभियंता निकम यांनी घेतला. त्याप्रमाणे कोतळूक बोऱ्याफाटा आणि नाना ओक थांबा येथे दोन आरसे Mirrors Mounted on Turns बसविण्यात आले आहेत. या आरशांची चोरी होणार नाही, आरसे सुरक्षित रहातील. याची जबाबदारी तेथील ग्रामस्थांनी घ्यावी. अशी विनंती बांधकामने केली आहे. मागणी पूर्ण केल्याबद्दल भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस,कोतळूक ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक व ग्रामस्थांनी बांधकाम विभागाला धन्यवाद दिले आहेत. Mirrors Mounted on Turns
अपघात टळल्यास आग्रह धरणार
बांधकाम विभागाने बसविलेल्या आरसांमुळे अपघात टळले, आरसे सुरक्षित राहीले तर ही सुविधा या मार्गावरील अन्य अवघड वळणांवरही उपलब्ध करुन द्यावी. अशी आग्रही मागणी आम्ही करणार आहोत.
– सचिन ओक, सरचिटणीस, भाजप गुहागर