• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मयुरेश माने यांना मायक्रोसॉफ्टचा पुरस्कार जाहिर

by Ganesh Dhanawade
September 18, 2021
in Old News
16 1
0
मयुरेश माने यांना मायक्रोसॉफ्टचा पुरस्कार जाहिर
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : मायक्रोसॉफ्टच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘मायक्रोसॉफ्ट इनोव्हेंटीव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट’ या पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील मयुरेश माने, रणजित देसाई, सुलताना भाटकर यांची निवड करण्यात आली आहे.
Mayuresh Mane, Ranjit Desai and Sultana Bhatkar from Ratnagiri district have been selected for the ‘Microsoft Innovative Educator Expert’ award given by Microsoft.

वर्गातील अध्यापनात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शिक्षण पद्धतीला वेगळे आयाम देणाऱ्या शिक्षकांना मायक्रोसॉफ्टच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. यंदाच्या वर्षी रत्नसागर इंग्लिश स्कूल दहिवली बु.।। ता.चिपळूण, जि. रत्नागिरी येथील तंत्रस्नेही शिक्षक मयुरेश माने व गुरुवर्य द.ज .सरदेशपांडे अध्यापक विद्यालय राजापूर कोदवली तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी येथील तंत्रस्नेही शिक्षक रणजित देसाई यांना तसेच मिस्त्री हायस्कूल रत्नागिरी येथील उपक्रमशील शिक्षिका सुलताना भाटकर यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. मयुरेश माने यांनी मायक्रोसॉफ्टच्या विविध टूल्सचा सहाय्याने तसेच स्काईपच्या मदतीने अध्यापन कार्यात नावीन्यता आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर रणजित देसाई यांनी सुद्धा मायक्रोसॉफ्टच्या विविध शैक्षणिक साधने व स्काईप वापरुन त्याचबरोबर Flipgrid चा वापर करून अध्यापन रंजक केले आहे. मयुरेश माने यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.

श्री रणजित देसाई यांना सलग दुसऱ्या वर्षी तर विशेष म्हणजे मयुरेश माने यांना रत्नागिरी जिल्ह्यातून प्रथमच या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. देशातील व परदेशातील शाळांमध्ये ऑनलाईन पध्दतीने टिचिंग केले जात आहे. त्यासाठी मायक्रोसॉफ्टने शिक्षक व विद्यार्थ्यांना एक वेगळी अशी संधी उपलब्ध करून दिली आहे तरी सर्व शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मयुरेश माने यांनी केले आहे.

Tags: AwardGuhagarGuhagar NewsMarathi NewsMicrosoftMicrosoft Innovative Educator ExpertNews in GuhagarRatnagiri Districtटॉप न्युजताज्या बातम्याद.ज .सरदेशपांडे अध्यापक विद्यालय राजापूरपुरस्कारमराठी बातम्यामायक्रोसॉफ्टमायक्रोसॉफ्ट इनोव्हेंटीव्ह एज्युकेटर एक्स्पर्टमिस्त्री हायस्कूल रत्नागिरीरत्नसागर इंग्लिश स्कूल दहिवलीलोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.