वेळणेश्वर अभियांत्रिकीचे विद्यार्थी घेतायत कोकण रेल्वेमध्ये प्रात्यक्षिक शिक्षण
गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय व कोकण रेल्वे अकॅडमी, मडगाव, गोवा यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी व यंत्र अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना कोकण रेल्वेद्वारे प्रात्यक्षिक शिक्षण दिले जात आहे. मागील तीन वर्षापासून महाविद्यालयातील विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. यावर्षी देखील तेवीस विद्यार्थी मडगाव येथे जाऊन प्रशिक्षण घेत आहे.
Due to Memorandum of Understanding between Maharshi Parashuram College of Engineering at Velneshwar in the taluka and Konkan Railway Academy, Madgaon, Goa Demonstration education is being imparted by the Konkan Railway to the students of Civil Engineering, Electrical Engineering and Mechanical Engineering of the college. College students have been taking advantage of this for the last three years. This year also, 23 students are going to Madgaon for training.
या प्रशिक्षणांतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ट्रॅक बनविणे, ब्रिज बनविणे, स्टेशनचे स्ट्रक्चर व बोगदे कसे बनवितात याविषयी मार्गदर्शन दिले जाते. या प्रशिक्षणांतर्गत पाच दिवस विविध विभागातील प्राविण्य असलेले मार्गदर्शक व्याख्यान देतात व त्याच दिवशी संबंधित विषयाशी निगडित असलेली क्षेत्रभेट दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होत आहे. नंतरचे दोन दिवस विद्यार्थी विविध ब्रिज व बोगदे यांना भेट देऊन त्याची रचना व तांत्रिक बाबी समजावून घेतात. याच विद्यार्थ्यांना पुढे जम्मू कश्मीर येथे जाऊन चिनाब नदीवर होत असलेला जगातील सर्वात उंच चिनाब ब्रिजचे बांधकाम पाहण्याची व तेथे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळते. हा ब्रिज बक्काल व काऊरी या दोन भागांना जोडणारा असून याची उंची 1178 फूट आहे. अशा भव्य स्थापत्यकलेचा अनुभव विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणांतर्गत मिळत आहे. त्याचबरोबर कश्मीरमध्ये विविध ठिकाणी सुरू असलेले रेल्वे बोगदे तयार करण्याच्या कामाची पाहणी करण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणात मिळते. महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालया बरोबर झालेल्या या सामंजस्य करारामुळे कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोकण रेल्वे मार्फत फ्री इंटरंशिप मिळते. तसेच या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र मिळत असल्याने जॉब मिळताना त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होतो.