जि. प. सदस्या नेत्रा ठाकूर, नवनीत ठाकूर यांचा पुढाकार
गुहागर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केल्यानंतर आता वेळणेश्वर कोविड केअर सेंटर मध्ये सर्व रुग्णांना वेळणेश्वर जि. प गटाच्या सदस्या सौ नेत्रा ठाकूर व वेळणेश्वर गावचे माजी सरपंच नवनित ठाकूर यांनी गरम पाणी करण्यासाठी इलेक्ट्रिक थर्मास, स्टीमर, मास सॅनिटायझर अशा वस्तू ची भेट दिली. ( Zilha Parishad Sadasya Netra Thakur Donates Electric Kettles, Steamers, Masks and Sanitizers to Covid Care Centre Velneshwar.)
तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे कोरोनाच्या पहिल्या लाटे पेक्षा या वेळी तालुक्यात अधिक रुग्ण संख्येबरोबरच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही अधिक आहे. हा प्रार्दुभाव आटोक्यात आणण्यासाठी गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर तालुक्यात कोविड सेंटर व कोरोना ग्रस्तांसाठी सर्वातोपरी मदत करत असताना त्यांनी आपल्या जि.प. सदस्य प.स. सदस्य व अन्य पदाधिकाऱ्यांना कोरोनाग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जि प सदस्या नेत्रा ठाकूर व माजी सरपंच नवनीत ठाकूर यांनी स्वखर्चाने वेळणेश्वर कोविड केअर सेंटर मधील कोरोना रुग्णांना आवश्यक असलेल्या साहित्याचे वाटप केले. ठाकूर दांपत्य हे कोरोना काळात आपल्या वेळणेश्वर जि प. गटातील गावांमधील ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असलेल्या नागरिकांची कोरोना तपासणीसाठी त्यांची ने-आण करणे त्यांना चांगली आरोग्य सुविधा मिळते की नाही हे पाहण्यासाठी रात्रंदिवस धावपळ करत आहेत. त्यांना या कामासाठी गुहागर रुग्णालयाचे वैद्यकीय डॉक्टर बळवंत, डॉक्टर राजेंद्र पवार, हेदवी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रताप गुंजवटे, डॉक्टर नागवेकर, आबलोली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्री गावड, श्री प्रणव पोळेकर यांचे सहकार्य लाभत आहे. ठाकूर दाम्पत्याने कोरोना च्या पहिल्या लाटे वेळी जि प गटातील अनेक गावांमध्ये गृहविलिगिकरण असलेल्या सर्वांचे मोफत आरोग्य तपासणी केली होती त्यांच्या या अभिनव उपक्रमाला तालुक्यासह जिल्हा प्रशासनाने कौतुक केले होते.
कोविड केअर सेंटर मधील रुग्णांना साहित्याची भेट देते वेळी तहसीलदार सौ लता धोत्रे, डॉक्टर सुबोध जाधव, परिचारिका श्रीमती कांबळे, सतीश मोरे, स्वप्निल गोणबरे, विनायक कांबळे, विलास कांबळे, तलाठी निलेश पाटील, श्री जांभळे आदी उपस्थित होते.