गुहागर : खालचापाट येथील मारुती छाया क्रिकेट संघाच्यावतीने दोन दिवस चालणाऱ्या नगरसेवक चषक ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेविका स्नेहल रेवाळे यांच्या हस्ते फीत कापून व किरण कला मंडळाचे अध्यक्ष उदय लोखंडे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
दि. १४ व १५ मार्च २०२१ रोजी खालचापाट भाटी येथे गुहागर नगरपंचायतीचे स्वच्छता आणि आरोग्य सभापती आणि प्रभाग १६ मधील कार्यतत्पर नगरसेवक अमोल गोयथळे यांच्या सहकार्याने नगरसेवक चषक ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या संघाला रोख रक्कम ५५५५/- चषक, उपविजेत्या संघास ३३३३/- व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षण, सामनावीर, मालिकविर यांची निवड करून चषक देऊन गौरव करण्यात येणार आहे.
या उदघाटन कार्यक्रमाला आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती अमोल गोयथळे, फ्रेंड सर्कल क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष सागर मोरे, सुनील गोयथळे, प्रकाश गोयथळे, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिता धनावडे, सुभाष घाडे, दिलीप गोयथळे, उमेश गोयथळे, प्रवीण घाडे, श्रीधर कुळे, एकनाथ जाधव, अनंत धनावडे, अभिजीत जाधव, नामदेव रामाणे, गणपत जागळी, ठेकेदार मोहन चव्हाण, बळीराम मालप, विजय धनावडे, रोहन विखारे, अमरदीप जाधव, सुहास जोशी, चंद्रशेखर लोखंडे, निलेश लोखंडे, शैलेश उदेग, दीपक जाधव, धनंजय लोखंडे, शुभम शेटे, निखिल रेवाले, सिद्धार्थ वराडकर, पुष्कर शिंदे, शुभम भयानक, सागर पाडावे, साहिल लोखंडे, संजय मालप, अतिष मालप, अथर्व लोखंडे, यश लोखंडे, अमेय लोखंडे, अक्षय लोखंडे, निखिल लोखंडे आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी रोहन विखारे यांच्यावतीने मारुती छाया क्रिकेट संघातील खेळाडूंसाठी टीशर्ट उपलब्ध करून दिल्याबद्दल संघातर्फे धन्यवाद देण्यात आले.
या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज विखारे यांनी केले. शुभारंभ सामना यजमान मारूती छाया संघ ( क )विरुद्ध जेएनसी जांगळेवाडी यांच्यात झाला. यामध्ये जेएनसी जांगळेवाडी संघाने विजय प्राप्त केला.







