Map of Guhagar
गुहागर ता. 2 : गुहागर शहराचा विकास आराखडा बनविण्यासाठी आजच्या स्थितीला गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रात कोणत्या ठिकाणी कोणती बांधकामे आहेत. मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्ते, पायवाटा, पाखाड्या कुठे आहेत. गावठाणे कुठे आहेत. शेती बागायती खालील जमीन कोणती. पडीक जमीन कोणती. शासकीय जागा किती, त्यांचा वापर कसा होत आहे. अशा प्रकारे शहरातील प्रत्येक जमीनचा सर्व्हे ड्रोनद्वारे, भुमि अभिलेख मधील नकाशांचा वापर करुन, नगरपंचायत, अन्य शासकीय यंत्रणांकडून माहिती घेवून करण्यात आला. त्यानंतर नगर रचना कार्यालयाने जमा झालेल्या माहितीच्या आधारे विद्यमान जमीनचा वापर नकाशा तयार केला. Map of Guhagar
हा नकाशा आपल्याला घरबसल्या पहाता यावा म्हणून गुहागर नगरपंचायतीच्या सहकार्याने आम्ही प्रसिध्द करत आहोत. या नकाशामध्ये एका बाजुला चौकटीमध्ये आपले क्षेत्र कोणत्या वापरात मोडते याच्या रंगांची माहिती देण्यात आली आहे. तरी सर्वांनी हा नकाशा पाहून घ्यावा ही विनंती. या नकाशा संदर्भात आपल्याला ज्या काही सूचना करायच्या असतील, माहिती हवी असेल तर गुहागर नगरपंचायतीकडे संपर्क साधावा. Map of Guhagar
संबंधित बातम्या