• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

by Ganesh Dhanawade
June 30, 2021
in Old News
17 0
0
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जिल्ह्यात असणारी रुग्णालये व अर्ज पद्धतीबाबत

रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हयात व शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कोरोना रुग्णांना वरदान ठरत आहे.
सदर उपचारासाठी लागणार खर्च सर्व सामान्यांना मदत म्हणून आहे. जिल्हयामध्ये एकूण १६ रुग्णालये या योजनेअंतर्गत समाविष्ठ आहेत. त्यामध्ये कोविड उपचाराचा लाभ घेणेसाठी जिल्हयातील शासकिय व खाजगी रुग्णालये खालील प्रमाणे,

?शासकिय रुग्णालये – जिल्हा शासकिय रुग्णालय, रत्नागिरी, उपजिल्हा रुग्णालय – कामथे, दापोली व कळंबणी

?ग्रामीण रुग्णालय – पाली, मंडणगड, गुहागर, संगमेश्वर

?खाजगी रुग्णालये – लाईफ केअर हॉस्पीटल, चिपळूण

?बी.के.एल. वालावलकर, डेरवन, चिपळूण.

?परकार हॉस्पीटल, रत्नागिरी.

या योजनेचा लाभ घेणेसाठी रुग्णालयात जाताना रुग्णांनी केशरी, पिवळे आणि शुभ शिधापत्रिका किंवा तहसिलदारांचा दाखला, शासकिय ओळखपत्र घेऊन जाणे आवश्यक आहे. सदर उपचारामध्ये रुग्णालयीन उपचाराकरीता शरीरातील ऑक्सीजनची पातळी ९४ टक्केच्या खाली असणारा रुग्ण किंवा व्हेंटीलेटरवर असणारे रुग्ण पात्र राहतील. सौम्य लक्षणे असणारी रुग्ण सदर योजनेत पात्र राहणार नाहीत. अधिक माहितीकरीता सदर रुग्णालयातील वैद्यकिय समन्वयक व आरोग्यमित्र यांचेशी संपर्क साधावा. कोविड १९ रुग्णांनी उपचार घेण्यासाठी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा असे  आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा शासकिय रुग्णालय, रत्नागिरी यांनी केले आहे.

Tags: CoronaCorona In GuhagarCorona NewsCovid19GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarकोरोनाकोरोना बातम्याकोविड केअर सेंटरगुहागरातील कोरोनाजिल्हा शल्यचिकित्सकजिल्हा शासकिय रुग्णालयटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यामहात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनारुग्णालयलोकल न्युजव्हेंटीलेटर
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.