गुहागर : उच्च शिक्षणासाठी कोकण सारख्या ग्रामीण आणि दुर्गम भागात करत असलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन Iconic Education Summit & Awards 2021 या समारंभात Zee Business आणि Top Gallant Media ह्यांच्या कडुन “ठाणे व कोकण विभागातील उत्कृष्ट महाविद्यालय” असा पुरस्कार डॉ. भानुप्रतापसींग वर्मा (लघु, सुक्ष्म, मध्यम उद्योग राज्यमंत्री, भारत सरकार) व सिने अभिनेत्री श्रीमती जयाप्रदा यांच्या हस्ते दिल्ली येथे पार पडलेल्या शानदार सोहळ्यात बुधवारी प्रदान करण्यात आला.
In recognition of his outstanding work in rural and remote areas, he was awarded the “Best College in Thane and Konkan Division” award. Bhanupratap Singh Verma and Cine actress Smt. Jayaprada presented the award at a glittering ceremony in Delhi on Wednesday.
रत्नागिरी जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या सोयी-सुवीधांची कमतरता लक्षात घेऊन विद्या प्रसारक मंडळ (ठाणे) यांनी २०१० साली वेळणेश्वर सारख्या ग्रामीण भागात महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाची पायाभरणी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुवीधा आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी २०१२ साली वेळणेश्वर येथे अभियांत्रिकी महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू झाले. सुरवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी कटीबद्ध राहिल्यामुळे वेळणेश्वर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाला अल्पावधीतच नॅकचे मानांकन प्राप्त झाले.
एवढ्या कमी कालावधीत नॅक चे मानांकन मिळवणारे मुंबई विद्यापीठाअंतर्गत सर्वात तरुण महाविद्यालय म्हणजे महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर होय. विद्या प्रसारक मंडळाने कोविड महामारीमुळे उद्भवलेली भीषण परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या मोहिमेला प्रतिसाद म्हणून मुलींसाठी महाविद्यालयात ‘कोकणकन्या शिष्यवृत्ती योजना’ 2020 पासून सुरू केली आहे. तसेच भाभा अणुसंशोधन केंद्रातील प्रथितयश निवृत्त वैज्ञानिक महाविद्यालयात येऊन नियमित केलेले मार्गदर्शन इत्यादी योजना विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाविद्यालय राबवत आहे.