जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आता “पेन्शन मार्च” ची तयारी
गुहागर : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना शाखा गुहागरची महत्वपूर्ण सभा उद्या रविवार दिनांक १२डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ठीक ११ वाजता जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा जानवळे नं १ येथे आयोजित करण्यात आली आहे.
Important meeting of Maharashtra State Old Pension Rights Association Branch Guhagar will be held on Sunday 12th December 2021 at 11 am at Zilla Parishad Purna Primary School Janwale No. 1 Has been organized.
२००५ नंतर शासकीय सेवेत आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना सध्या लागु असलेली एन.पी.एस. योजना रद्द करून जूनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी राज्यस्तरीय समन्वय समितीच्या माध्यमातून राज्याध्यक्ष वितेश खांडेकर व राज्यकार्यकारीणीच्या नेतृत्वाखालील “पेन्शन संघर्ष यात्रे” ला राज्यभरातील सर्वच विभागातील लाखो शासकीय कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या संघर्ष यात्रेच्या अभूतपूर्व यशानंतर २२डिसेंबर रोजी कल्याण ते मुंबई पेन्शन मार्चचे नियोजन राज्यस्तरावर करण्यात येणार आहे त्याचे नियोजन करणे, जिल्हा महिला संघटन तालुका सदस्य निवड करणे, यांबरोबरच अन्य महत्त्वपूर्ण विषयांवर, शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर या सभेत चर्चा करण्यात येणार आहे. तरी सर्व शिलेदारांनी सदर सभेसाठी वेळीच उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे गुहागर तालुकाध्यक्ष अमोल धुमाळ, उपाध्यक्ष प्रदीप पडवाळ, सागर भडंगे,सचिव राहुल आमटे, कार्याध्यक्ष महेश आंधळे,कोषाध्यक्ष ईश्वर घनवटे, राज्य प्रतिनिधी दिपक साबळे, जिल्हा प्रतिनिधी शिवराम अंकुलगे, इमाम पाटील, सल्लागार बाबासाहेब राशिनकर,डी.के राठोड,साजीद मुकादम, प्रसिद्धी प्रमुख ईश्वर हलगरे, शिवाजी गायकवाड, संपर्क प्रमुख प्रभु हंबर्डे, शारिक अहमद, सहचिटणीस धनंजय डिसले, पांडुरंग फड, गणेश रोडे, जुनैद शेख, महिला प्रतिनिधी निशिगंधा भुते, तालुका संघटक अजय खेराडे, भास्कर गावडे, प्रमुख प्रवक्ते अण्णासाहेब शिंदे, धनपालसिंग राजपुत,बीट संघटक अवधूत राऊतराव, गणेश डुबे, नितीन खाडिलकर संजय राठोड व सर्व गुहागर तालुका कार्यकारणीच्या वतीने करण्यात आले आहे.