• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

फ्रेंड सर्कल मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत महापुरुष संघ विजेता

by Ganesh Dhanawade
March 9, 2021
in Old News
16 1
0
फ्रेंड सर्कल मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत महापुरुष संघ विजेता
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

फाइज इलेव्हन आबलोली उपविजेता

गुहागर : शहरातील खालचापाट येथील फ्रेंड सर्कल कला क्रिडा सांस्कृतिक मंडळ आयोजित टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेत गुहागरच्या महापुरुष संघाने फाइज इलेव्हन आबलोली संघाचा पराभव करत अंतिम विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत तालुक्यातील ३२ संघांनी सहभाग घेतला होता. सलग पाच दिवस चालणाऱ्या स्पर्धेचे उत्तम नियोजन या मंडळाने केले होते.
अंतिम सामन्यातील सामनावीर आणि मालिकावीर म्हणून प्रतिक मोहिते याला गौरविण्यात आले. तर सर्वोत्तम फलंदाज म्हणून यश लोखंडे , सर्वोत्तम गोलंदाज म्हणून अमित पवार, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक रोहन पवार यांना चषक देऊन गौरविण्यात आले. महापुरुष गुहागर संघाने उपांत्य फेरीत विधाता असगोली संघाचा पराभव करत तर फाइज इलेव्हन आबलोली संघाने उपांत्य फेरीत दत्त कृपा बोऱ्या संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभाला फ्रेंड सर्कल कला क्रिडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री. सागर मोरे, उपाध्यक्ष श्री. अनिकेत भोसले, सचिव रोहन विखारे, खजिनदार अनराज वराडकर, माजी नगराध्यक्ष श्री जयदेव मोरे, आरोग्य सभापती श्री अमोल गोयथळे, नगरसेविका अपर्णा गोयथळे , श्री. सुहास सुर्वे, श्री. शशिकांत शिंदे, श्री. सूनिल गोयथळे, श्री. वसंत पावसकर, श्री. प्रशांत मोरे, श्री. वसंत आरेकर, श्री. संदीप मोरे, आदी उपस्थित होते.
संपूर्ण स्पर्धेत पंच म्हणून नंदकुमार वराडकर, मंदार गोयथळे, सिद्धार्थ वराडकर, योगेश गोयथळे, मितेश वराडकर, अमित खांडेकर, केतन गोयथळे यांनी काम पाहिले. अंतिम सत्राच सुत्रसंचालन सुयोग आरेकर आणि सिद्धेश आरेकर यांनी केले.

उत्कृष्ट फलंदाज यश लोखंडे याला गौरविताना सुनील गोयथळे व प्रशांत मोरे

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarक्रिकेटटॉप न्युजताज्या बातम्याफ्रेंड सर्कल मंडळमराठी बातम्यामहापुरुष संघलोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.