भावी पिढीने साहेबांचे विचार पुढे न्यावेत – सुदाम घुमे
गुहागर : त्यागी व्रुतीचे आदर्श लोकनेते, कुणबी समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेले थोर समाज सुधारक, दीन दुबळ्यांसाठी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत कार्य करणारे, बहुजनांच्या हृदयात देवमाणसाचे स्थान असलेले समाजनेते व गुहागर तालुक्याचे माजी आमदार कै. रामभाऊ बेंडल यांचा २७ वा स्मृतीदिन शनिवारी (दि. २४ जुलै ) रोजी कोरोना महामारीचे नियम पळून गुहागर तालुक्यातील ठराविक समाजबांधव व हितचिंतकांच्या उपस्थितीत पार पडला.
Tyagi Vruti ideal public leader, great social reformer focused on the development of Kunbi community, working till the last breath of life for the poor, social leader with a place of God in the heart of Bahujans and former MLA of Guhagar taluka. Rambhau Bendal’s 27th memorial day was celebrated on Saturday (July 24) in the presence of certain community members and well-wishers in Guhagar taluka.
शहरातील संत तुकाराम छात्रालय, किर्तनवाडी येथे काही ठराविक सहकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी स्मृतीदिनी जाहिर कार्यक्रम न घेता आपल्या लाडक्या नेत्याच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. रामभाऊ बेंडल प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुदाम घुमे, रामभाऊंचे चिरंजीव तथा गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन बेंडल, नगरसेविका मनाली सांगळे, महादेव साटले, मारुती झिंबर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप बेंडल, राजेंद्र भागडे यांच्या हस्ते स्व. रामभाऊंच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी चंद्रकांत पागडे, नगरसेवक प्रसाद बोले, माधव साटले, सुरेश बोले, सुनील रेवाले, पांडुरंग उदेक, मनोहर मुकनाक, सुभाष सोलकर, जनार्दन भागडे, डॉ. मयुरेश बेंडल, मुकेश मांडवकर, संतोष सोलकर, शंकर डिंगणकर आदी उपस्थित होते.
या स्मृतीदिनी कार्यक्रमात माजी आमदार स्व. रामभाऊंच्या आठवणींना उजाळा देताना नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी साहेबांनी अनेक मोठ्या पदांवर काम केले, पण सत्ता केंद्र आपल्याच कुटुंबात असावे म्हणून मुलांना कधी राजकारणात आणले नाही. त्यांनी समाजातील प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळावी हा उद्देश ठेवला. आजचे राजकारण हे खूप वेगळे आहे.आपल्या कार्यकाळात तरुणांना सामाजिक कार्यात सक्रिय करून घेतले होते. आज 27 वर्ष होऊन सुध्दा त्यांचे विचाराने तालुक्यातील असंख्य समाज बांधव समाज सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या संस्था ठिकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ते पुढे म्हणाले की, साहेबांच्या कृतीतून आम्ही शिकलो. त्यांच्या सारखे काम करणे शक्य नाही, पण प्रयत्न आपण नक्की करू शकतो. आज समाज उन्नतीसाठी राजकारणात आपले अस्तित्व निर्माण करण्याची गरज आहे. आणि भविष्यात समाज हितासाठी राजकारणात मोठा निर्णय आपण घेणार आहोत, असे बेंडल यांनी सांगितले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुदाम घुमे यांनी भावी पिढीने रामभाऊंनी निर्माण केलेल्या संस्था अखंडितपणे कार्यरत ठेवाव्यात, अशी इच्छा व्यक्त केली. माधव साटले समाजातील तरुणांनी साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. त्यासाठी तरुणांपुढे त्यांच्या कार्याची माहिती देणे गरजेचे आहे. तरुणांच्या माध्यमातूनच बेंडल साहेबांचे विचार समाजात खोलवर पोहचतील, असा आशावाद व्यक्त केला. आजचा दिवस हा तरुणांना उजाळा देणारा आहे. तरुण पिढीमध्ये साहेबांच्या कार्याचे बीज रोवले पाहिजे. समाज उभा करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. त्यांनी तयार केलेली समाज पुस्तिका समाजासाठी आज दिशादर्शक ठरत असल्याचे संतोष सोलकर यांनी सांगितले.
अडूर येथील सामाजिक कार्यकर्ते मारुती झिंबर म्हणाले, कुणबी समाजातील प्रत्येक घटकाने रामभाऊंचे विचार अंमलात आणले तर तालुक्यात सामाजिक परिवर्तन करणे सहज शक्य आहे. यावेळी समाजातील दिवंगत व्यक्ती, कोरोनाने मयत झालेल्या व अतिवृष्टीमध्ये मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिण्यात आली.