• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दोन घरात शिरली वीज, मनुष्यहानी नाही

by Mayuresh Patnakar
October 18, 2022
in Guhagar
20 1
0
Lightning Strike

Lightning Strike

40
SHARES
115
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जानवळे व वेळंबमधील घटना; मुसळधाराने जनजीवन विस्कळीत

गुहागर, ता. 18 : आज दुपारी वीजांच्या कडकडासह तासभर पडलेल्या पावसाने शृंगारतळी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. वेळंब आणि जानवळे बौध्दवाडीतील घरावर वीज कोसळली. Lightning Strike सुदैवाने घरात कोणीच नसल्याने मनुष्यहानी टळली. महामार्गाच्या ठेकेदाराने गटारांचे काम चुकीच्या पध्दतीने केल्याने आज पुन्हा एकदा दोन दुकानात पाणी शिरले. Flood Water entered two shops.

गुहागर तालुक्यात मंगळवारी सकाळच्या सत्रात वेगवेगळ्या वेळी बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. दुपारी 12 ते 1 या वेळेत शृंगारतळी परिसराला पावसाने अक्षरश: झोडपले. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटामुळे (Lightning Strike) या परिसरात भितीचे वातावरण होते.

Lightning Strike

Lightning Strike

याच वेळी शृंगारतळी लगतच्या जानवळे बौध्दवाडीतील सुधीर जाधव यांच्या घरावर वीज कोसळली. कौलारु छपरातून घरात शिरलेल्या वीजेमुळे घरातील सर्व वीज वाहिन्यां जळून खाक झाल्या. वीज वाहिन्यांवर असलेला काळ्या प्लास्टीकच्या पाईपचे तुकडे झाले. बटणांचे स्वीच जळले. इलेक्ट्रॉनिक उपकरणे नादुरुस्त झाली. घरात शिरलेली वीज भिंतीमधुन बाहेर पडल्याने भिंतीला तडे गेले. सुधीर जाधव यांच्या घरात दोन कुटुंबे रहातात. ही दोन्ही कुटुंबे शेजारच्या घरात केली होती. त्यामुळे कोणीही जखमी झाले नाही.
वेळंब बौध्दवाडीतील जगदीश शिवराम जाधव यांच्या घराशेजारी शौचालयावर वीज कोसळली. यामुळे शौचालयाचे नुकसान झाले. शिवाय या वीजेमुळे घरातील वीजवाहिन्या, स्वीच जळले. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचेही नुकसान झाले. शृंगारतळीत रहाणारे अमिष कदम यांच्या घरातील 65 इंची एल.ई.डी. टिव्ही (LED TV) वीजेचा प्रवाह शिरल्याने बाद झाला. त्याचप्रमाणे वीज मिटरही नादुरुस्त झाला आहे. Lightning Strike

Lightning Strike
Lightning Strike

Flood Water entered two shops

शृंगारतळीत तासभर मुसळधार पाऊस पडल्याने गुहागर विजापूर महामार्गाला पुन्हा एकदा नदीचे स्वरुप आले होते. गटारे रिकामी आणि रस्त्यावरुन वहाणारे पाणी असे चित्र या पावसाळ्यात आजपर्यंत 5 वेळा पहायला मिळाले. रस्त्यावरुन वहाणारे पाणी पुन्हा एकदा ग्लोब इलेक्ट्रिकल्स् या दुकानात शिरले. ठेकेदार आणि महामार्गाचे अधिकारी यांच्यापर्यंत  हा विषय वारंवार पोचवून ही त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शृंगारतळीतील ग्रामस्थ आता ही गटारे बुजविण्याचा विचार करत आहेत.

Flood Water entered two shops
Flood Water entered two shops

Tags: Guhagar News, Marathi News, Flood Water entered two shops, Lightning Strike, News in Guhagar, Latest News, Latest Marathi News, ताज्या बातम्या, लोकल न्यूज, टॉप न्यूज,

Tags: Flood Water entered two shopsGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsLightning StrikeMarathi NewsNews in Guhagarटॉप न्यूजताज्या बातम्यालोकल न्यूज
Share16SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.