…..तर रास्ता रोकोसारखे उग्र आंदोलन करू – माधुरी घावट
गुहागर : अधिसंख्य पदावरील सेवानिवृत्त कर्मचा-यांना पेन्शन मिळावी, या व इतर न्याय्य मागण्यांसाठी गेल्या 2 ऑक्टोबर पासून आझाद मैदानावर सुरू असलेले आंदोलन-साखळी उपोषण आम्ही आतापर्यंत नम्रपणे व गांधीजींच्या विचारांनी सुरू ठेवले आहे. मात्र, अद्यापही शासन आमच्या मागण्यांबाबत कोणताही निर्णय घेणार नसेल, तर रेल रोको, रस्ता रोको सारखे उग्र आंदोलन ‘आफ्रोह’ च्या वतीने हाती घ्यावे लागेल व या आंदोलनाचे जे परिणाम होतील त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असा सज्जड इशारा ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन रत्नागिरी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. माधुरी घावट व सचिव श्रीमती माधुरी मेनकार यांनी शासनास दिला आहे.
If the government does not take any decision on our demands, then violent agitation like Rail Rocco, Rasta Rocco will have to be undertaken on behalf of ‘Afroh’ and the government will be fully responsible for the consequences of this movement. Such a warning was given by Afroh Ratnagiri District President of Women’s Front Mrs. Madhuri Ghawat and Secretary Smt. Madhuri Menkar have given it to the government.
दि. 24 ऑक्टो. 2021 रोजी उपोषणाच्या 23 व्या दिवस ‘आफ्रोह’च्या साखळी उपोषणासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील महिला आघाडीच्या 10 कर्मचारी आझाद मैदान, मुंबई येथे हजर झाल्या. शासनाकडून आमच्या प्रश्नाबाबत होत असलेल्या हलगर्जीपणाबाबत तीव्र संताप व्यक्त करत त्यांनी हा इशारा दिला आहे. यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा अनघा वैद्य, राज्य कार्यकारिणी सदस्य सौ. प्रिया खापरे, रत्नागिरी महिला आघाडीच्या उपाध्यक्ष उषा पारशे यासोबत राज्य कार्यकारीणी सदस्य नरेश खापरे, आफ्रोहचे प्रसिद्धीप्रमुख व जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर, ठाणे जिल्हा अध्यक्ष दयानंद कोळी, घनश्याम हेडावू, ठाणे महिला आघाडीच्या अध्यक्षा स्मिता भोईर व आफ्रोहचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
गेले 23 दिवस महाराष्ट्रातील कानाकोप-यातून प्रवास करून आमचे कर्मचारी बांधव इथे उपोषणासाठी येत आहेत. तरीही शासन याची दखल घेत नाही. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून शासन करते तरी काय?असा प्रश्नही सौ. घावट व श्रीमती मेनकार यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील अनेक कर्मचारी सेवानिवृत्त वेतनापासून वंचित असून त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. आम्ही आमच्या हक्काचे मागतो, भिक मागत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सौ. माधुरी घावट,(जिल्हाध्यक्ष), श्रीमती माधुरी मेनकार, (जिल्हा सचिव), पुणे जिल्हाध्यक्ष अनिल झाडे व सचिव अभय जगताप हे कर्मचारी उपोषणाला बसले होते. तसेच उपोषणकर्त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी महिला आघाडीच्या प्रतिभा रोडे, मंगला रोडे, अलका टिक्कस, राजकन्या भांडे, लता वढाळ, गोकुळा धनी, चंद्रकला खेडकर, नंदा राणे हे सुद्धा आझाद मैदानावर यावेळी उपस्थित होते.