• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अडुर-पालशेतमध्ये बिबट्याचा संचार

by Ganesh Dhanawade
September 12, 2020
in Old News
17 0
0
अडुर-पालशेतमध्ये बिबट्याचा संचार
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : तालुक्यातील अडुर व पालशेतमध्ये भर वस्तीमध्ये बिबट्याचा मुक्तसंचार होऊ लागला आहे. यामुळे गेले दोन महिने येथील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे .         

 वस्तीमध्ये अंगणापर्यंत त्याचा वावर सुरू  झाला असून भटक्या कुत्र्यांना भक्ष्य बनवित आहे. यामुळे वनविभागाने बिबट्याला पकडून सुरक्षितस्थळी नेऊन सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तालुक्यातील अडुर येथील ग्रामस्थांनी या अगोदर वनविभागाकडे बिबट्याच्या मुक्त वावराबाबत माहिती दिली होती. वनविभागाच्या वतीने अडुर येथे दोन ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता. परंतु त्या पिंजऱ्यामध्ये तो सापडत नसल्याने पिंजरा पुन्हा चिपळूण येथे पाठवण्यात आला. नुकतेच अडुर ब्राम्हणवाडी येथील ओंकार खरे यांच्या घराच्या अंगणातुन कुत्र्याला पकडून नेल्याची घटना घडली. पालशेत येथेही तोच प्रकार सुरू असून यावर वनविभागाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarअडुरगुहागर वनविभागटॉप न्युजताज्या बातम्यापालशेतमराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.