गुहागर : तालुका विधी सेवा समिती गुहागर, वकील संघ व पंचायत समिती गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून बाईक रॅली काढण्यात आली. Taluka Legal Services Committee Guhagar, Vakil Sangh and Panchayat Samiti Guhagar jointly organized a bike rally on the occasion of the birth anniversary of Mahatma Gandhi.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीमध्ये विधी सेवा सप्ताह साजरा करण्याच्या मार्गदर्शक सुचना मिळाल्या आहेत. आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत संपूर्ण भारतभर जागरुकता व संपर्क हा उपक्रम ४५ दिवस राबविण्यात येणार असून नागरिकांना विविध मोफत विधी सेवा योजनांविषयी प्रबोधन आणि कायदेविषयक जनजागृती व्हावी, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. तालुका विधी सेवा समिती, गुहागर यांचेमार्फत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील बाईक रॅलीचे उद्घाटन पंचायत समिती गटविकास अधिकारी अमोल भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. बाईक रॅलीसाठी गुहागर न्यायालयाचे न्यायाधीश बी. ए. दुर्गवडे, गुहागर वकील बार असोसिएशनच्या अध्यक्षा एम. एम. आरेकर, गुहागर पोलिस ठाण्याचे सहा पोलिस निरीक्षक बी के जाधव, विधिज्ञ एस. ए. साळवी, एम. बी कानसे, डी. डी. विचारे, एस ए. मोरे कायदा साथी अलंकार विखारे, सर्व न्यायालयीन कर्मचारी पंचायत समिती व तहसील कार्यालयाती कर्मचारी यांनी या बाईक रॅलीमध्यो उत्स्फूर्त सहभाग घेवून आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यास आपापले योगदान दिले.