सह्याद्री प्रतिष्ठान आणि तवसाळ ग्रामस्थांचे योगदान
गुहागर : सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान, जिल्हा रत्नागिरी यांच्या अंतर्गत गुहागर विभागाच्यावतीने आणि तवसाळ ग्रामस्थांच्या सहभागाने तवसाळ येथील विजयगडाच्या संवर्धन मोहिमेला प्रारंभ केला आहे. या मोहिमेचा प्रारंभीचा भाग म्हणुन सह्याद्री प्रतिष्ठान आणि तवसाळ ग्रामस्थांच्यावतीने किल्ल्याच्या प्रथम दर्शनी भागाची, प्राचीन वाड्यांच्या चौथ-यांची साफसफाई, जंगलतोड, गवत काढणी करण्यात आली. यामुळे गवताने वेढलेल्या विजयगडाने मोकळा श्वास घेतला आहे.
Under the Sahyadri Pratishthan Hindustan, District Ratnagiri, on behalf of Guhagar Division and with the participation of Tavsal villagers, the conservation campaign of Vijaygad at Tavsal has been started. As an initial part of this campaign, the first sight of the fort, the quarters of the ancient forts were cleared, deforestation and grass cutting were done. As a result, Vijaygad, surrounded by grass, has breathed a sigh of relief.


सह्याद्री प्रतिष्ठान यांची दुर्ग शोध आणि संवर्धन मोहीम यामाध्यमातून छत्रपतींच्या इतिहासाची आधुनिक युगाला ओळख व्हावी यासाठीची चळवळ आणि विजयगडाचे संवर्धन झाल्यास व साफसफाई झाल्यास या ठिकाणी येणाऱ्या पर्यटक संख्येमध्ये वाढ होईल. गावाच्या वैभवात भर पडेल आणि पर्यटनाच्या माध्यमातून येथे रोजगार निर्मिती होईल. हा ग्रामस्थांचा ध्यास या दोन्हींच्या माध्यमातून विजयगड दुर्ग संवर्धन आणि साफसफाई मोहिमेला मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला आहे.
यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान गुहागर विभागातील दुर्ग सेवक नयन चांदोरकर, मनीष कदम, वैभव घुमे, निलेश चांदोरकर, जोत्स्ना चांदोरकर, प्रसाद जांगळी, शैलेश भुवड, विराज भुवड, शैलेश किजबिले, अनिकेत कदम, समीर गुळेकर, आकाश मंचेकर, जय खाडे, कौस्तुभ बारगोडे आदी सहभागी झाले होते. तर तवसाळ ग्रामस्थांच्यावतीने प्रीतम सुर्वे, रत्नदीप गडदे, महेश शंकर सुर्वे, प्रणय सुर्वे, प्रसन्ना गवंडे, जयेश गडदे, शरद सुर्वे, महेश बळीराम सुर्वे, सागर जाधव हे सहभागी झाले होते. दुर्ग संवर्धन आणि स्वच्छता मोहीम राबिवल्याबद्दल सह्याद्री प्रतिष्ठान विभाग गुहागर तालुका आणि तवसाळ ग्रामस्थ यांचे शिवप्रेमींमधुन विशेष कौतुक होत आहे.

