ओंकार वरंडे याचे नव्या व्यवसायात प्रदार्पण
गुहागर : तालुक्यातील प्रसिद्ध विमा प्रतिनिधी संतोष वरंडे व गुहागर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष स्नेहा वरंडे यांचा सुपुत्र ओंकार वरंडे याने वरवेली येथे सुरू केलेल्या ओंकार इंजीनियरिंग सोल्युशन या वर्कशॉपचे उद्घाटन वरवेली ग्रामपंचायत सरपंच पूनम रावणंग व मानकरी जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
या वर्कशॉपमध्ये सर्व प्रकारच्या फॅब्रिकेशन वर्क, लेथ मशीन, कस्टम मशीन वरील सर्व कामे केली जाणार आहेत. ओंकारला या व्यवसायातील चांगला अनुभव आहे. या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर, शिवतेज फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड. संकेत साळवी, वैद्य ऑटोमोबाईलचे प्रसाद वैद्य, उद्योजक माधव ओक, प्रकाश भावे, आयडिबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. राहुल पाटील, सचिन मुसळे, जीवनश्री प्रतिष्ठानचे विजय सावंत, सिद्धिविनायक जाधव, निलेश गोयथळे, नितीन बेंडल, मनोज बोले, अमित मालप, शामकांत खातू, सुधाकर कांबळे, प्रशांत कांबळे, प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय शाखा गुहागरच्या शिल्पा भहनजी, उदय रावणंग, श्री कॉम्प्युटसचे संतोष मोरे, केतन वरंडे, नगरसेविका सुजाता बागकर, श्रीधर बागकर, नगरसेवक विकास मालप, राहुल कनगुटकर, भारतीय आयुर्विमा चिपळूण शाखेचे अध्यक्ष अनंत भाटवडेकर, शशिधर कान्हेरे, विवेक जोशी, ऋषिकेश तवसाळकर, शेखर विचारे, शशिकांत दाभोलकर, जयदेव मोरे, प्रदीप बेंडल, किशोर तांबट, अमित मोरे, डॉ. मयुरेश बेंडल आदीसह संवाद परिवारातील सदस्य उपस्थित होते.