मार्ग बंद झाल्याने धरणावर जाणाऱ्यांची अडचण
गुहागर : तालुक्यातील वेलदूर येथील स्वयंभू श्री सिद्धेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जल सुविधा योजनेतून सुमारे पाच लाख रुपये खर्चून तीन महिन्यापूर्वी झालेला रस्ता अतिवृष्टीमुळे खचून मार्ग पूर्णपणे बंद झाल्याची घटना घडली आहे.
The road leading to the Swayambhu Shri Siddheshwar Mandir at Veldur in the taluka, which was constructed three months ago at a cost of about Rs.5 lakhs. The road has been completely closed due to heavy rains.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा अंजनवेल जिल्हा परिषद गटाचे सदस्य विक्रांत जाधव यांच्या माध्यमातून वेलदुर येथे निसर्गरम्य अशा स्वयंभू श्री सिद्धेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी जल सुविधा योजनेतून सुमारे पाच लाख रुपये खर्चून तीन महिन्यापूर्वी रस्ता झाला आहे. सदरील रस्त्याचे काम जून महिन्यातहि सुरू होते. या मंदिराबरोबरच येथील धरणावर पावसाळ्यात आंघोळ करण्यासाठी अनेक ठिकाणाहून तरुण मंडळी येत असते. रस्ता डांबरीकरण करण्यात आल्याने वाहने घेऊन जाणे शक्य झाले होते. परंतु, गेली काही दिवस धो धो कोसळत असलेल्या पावसामुळे तीन महिन्यापूर्वी झालेल्या रस्त्यावर मोठ मोठे चर पडले आहेत. वाहनेच नाहीतर चालत जाणेही कठीण होऊन बसले आहे.