गुहागर, ता. 28 : येथील शांताई रिसॉर्ट चे संचालक सिद्धेश खानविलकर यांनी कोकण हेरिटेज राईट या चे आयोजन केले होते. या उपक्रमांतर्गत विविध राज्यातील 60 विंटेज दुचाकीस्वार दोन दिवस गुहागरात पर्यटनासाठी आले होते. यानिमित्ताने गुहागरकरांना जावा, एजडीई, जुन्या बुलेट या विंटेज बाईक पहाता आल्या.
The Konkan Heritage Right was organized by Shantai Resort Director Siddhesh Khanwilkar. Under this initiative, 60 vintage two-wheelers from different states had come to Guhagar for a two-day tour. On this occasion, Guhagarkar got to see vintage bikes like Java, AJDE, old bullets.
कोकणातील निसर्ग सौंदर्य, येथील जनजीवन, वास्तू कला, परंपरा विविध राज्यात पोचावी म्हणून कोकण हेरिटेज राईड हा उपक्रम सिद्धेश खानविलकर आणि प्रवीण रणपिसे यांनी आयोजित केला होता. यामध्ये सहभागी झालेल्या पर्यटकांना अडूर बुधल गावातील डोंगरावर असलेले दुर्गादेवी मंदिर, गुहागर मधील 106 वर्ष जुने कोकणातील घर, समुद्र किनारा, व्याडेश्वर मंदिर आदी स्थळे दाखविण्यात आली.
या राईड चे वैशिष्ट्य म्हणजे रँलीत 50 वर्षांपूर्वी लोकप्रिय असलेल्या जावा एसडी, बुलेट यांचा समावेश होता. सर्वात जुनी गाडी 1962 मधील होती. एक गाडी 1970 मध्ये झेकोस्लोवाकिया या देशातून आयात केलेली दुचाकी होती. राँयल इनफिल्ड कंपनीचे पहिले बुलेट माँडेल ही होते. त्यामुळे गुहागर मधील वाहनप्रेमींना जुन्या गाड्या पहाण्याची संधी मिळाली. या उपक्रमात पुणे आणि मुंबई तील 7 महिला दुचाकीस्वार सहभागी झाल्या होत्या.
कोरोना संकटानंतर गुहागर मध्ये पर्यटन व्यवसाय सुरु झाला आहे. हा संदेश देशात पोचावा म्हणून कोकण हेरिटेज राईड उपक्रम केला अशी माहिती आयोजक सिद्धेश खानविलकर यांनी दिली. तर जुन्या गाड्या नियमितपणे देखभाल केली तर धावू शकतात. यापूर्वी आम्ही कन्याकुमारी ते लद्दाख दरम्यान 13 यात्रा हाच जुन्या गाड्या घेऊन केल्या आहेत. असे प्रवीण रणपिसे यांनी सांगितले.