मारुती छाया क्रिकेट संघ उपविजेता
गुहागर : खालचापाट येथील मारुती छाया क्रिकेट संघाच्यावतीने नगरसेवक चषक ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत किर्तनवाडी स्पोर्ट्स संघाने विजेतेपद तर यजमान मारुती छाया खालचापाट संघाने उपविजेते पद प्राप्त केले. या स्पर्धेत तालुक्यातील ३६ संघांनी सहभाग घेतला होता.
दि. १४ व १५ मार्च २०२१ रोजी खालचापाट भाटी येथे गुहागर नगरपंचायतीचे स्वच्छता आणि आरोग्य सभापती आणि प्रभाग १६ मधील कार्यतत्पर नगरसेवक अमोल गोयथळे यांच्या सहकार्याने नगरसेवक चषक ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेविका स्नेहल रेवाळे, फ्रेंड सर्कल क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सागर मोरे, दिलीप गोयथळे सुनील गोयथळे यांच्या हस्ते फीत कापून व किरण कला मंडळाचे अध्यक्ष उदय लोखंडे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. विजेत्या कीर्तनवाडी संघाला रोख रक्कम ५५५५/- चषक, उपविजेत्या संघास ३३३३/- व चषक देऊन गौरविण्यात येणार आले. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून किर्तनवाडी स्पोर्ट्स संघाचा प्रतीक ठोंबरे, गोलंदाज मारुती छाया संघाचा सागर पाडावे, क्षेत्ररक्षण दीपक जाधव, सामनावीर किर्तनवाडी स्पोर्ट्सचा अजित ठोंबरे तर मालिकविर म्हणून किर्तनवाडी स्पोर्ट्स संघाच्या विक्रांत जोशी यांची निवड करून चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष स्नेहा भागडे, आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती अमोल गोयथळे, नगरसेविका स्नेहल रेवाले, फ्रेंड सर्कल क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष सागर मोरे, मयुरेश कचरेकर, सुनील गोयथळे, प्रकाश गोयथळे, सुभाष घाडे, दिलीप गोयथळे, प्रवीण घाडे, श्रीधर कुळे, एकनाथ जाधव, अनंत धनावडे, गणपत जागळी, ठेकेदार मोहन चव्हाण, सुनील रेवाले, किरण कला मंडळाचे अध्यक्ष उदय लोखंडे, प्रमोद लोखंडे, श्री. शिंदे, निलेश कुळे, रवींद्र विखारे, अरुण जोशी, मधुकर पाटील, राजू बेंडल, अनिल रेवाले, संकेत गोयथळे, संजय मालप, जयंत मालप, विकास मालप, रोहन विखारे, अमरदीप जाधव, सुहास जोशी, चंद्रशेखर लोखंडे, निलेश लोखंडे, शैलेश उदेग, दीपक जाधव, धनंजय लोखंडे, शुभम शेटे, निखिल रेवाले, सिद्धार्थ वराडकर, पुष्कर शिंदे, शुभम भयानक, सागर पाडावे, साहिल लोखंडे, संजय मालप, अतिष मालप, अथर्व लोखंडे, यश लोखंडे, अमेय लोखंडे, अक्षय लोखंडे, निखिल लोखंडे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेचे सूत्रसंचालन अरुण भागडे, सुयोग आरेकर यांनी केले. पंच म्हणून सोहम कणगुटकर, विक्रांत जोशी यांनी काम पाहिले.