गुहागर युवा शक्ती मंचातर्फे केमिस्ट असोसिएशनला निवेदन
गुहागर : गुहागर शहरातील मेडिकल दुकाने लवकर बंद होत असल्याने नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन गुहागर युवा शक्ती मंचाच्या वतीने गुहागर तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसिलदार व गुहागर केमिस्ट असोसिएशन यांना निवेदन देण्यात आले.
A statement was issued on behalf of Guhagar Yuva Shakti Manch to Guhagar Taluka Medical Officer, Tehsildar and Guhagar Chemist Association considering the inconvenience caused to the citizens due to early closure of medical shops in Guhagar city.
गुहागर शहरातील तरुणांनी एकत्रित येऊन युवा शक्ती मंचाची स्थापना केली आहे. शहरात सामाजिक कार्य करणे हे या तरुणांचा मुख्य उद्देश आहे. सद्या सगळीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. अशा या परिस्थितीत नागरिकांना आरोग्य सुविधेची नितांत गरज आहे. गुहागर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून याठिकाणी वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे नागरिकांना या सुविधा उपलब्ध करण्यासाठी वणवण करावी लागते. शहरातील सर्वच मेडिकल दुकाने ही रात्री 8.30 वाजता बंद होत असल्याने त्यानंतर कोणाला औषधे लागल्यास मोठी अडचण निर्माण होते. त्या व्यक्तीला शृंगारतळी किंवा शक्य असल्यास मेडिकल दुकानदार यांच्या घरी जाऊन औषधे घ्यावी लागतात.
दरम्यान, मेडिकल दुकाने ही आपत्कालीन सेवेत मोडतात. कोरोनाच्या आपत्ती मध्ये कधी कोणाला वैद्यकीय सेवेची आवश्यकता लागेल हे सांगता येत नाही. अशावेळी शहरातील सर्व मेडिकल दुकानदारांनी योग्य नियोजन करुण किमान एक तरी मेडिकल दुकान रात्री १०.३० पर्यत सुरू ठेऊन नागरिकांना सेवा उपलब्ध करून द्यावी, या मागणीचे निवेदन गुहागर युवा शक्ती मंचाने दिले आहे. यावेळी युवा शक्ती मंचाचे श्री.राज विखारे, कु.प्रसाद भागडे, कु. सोहम सातार्डेकर, कु. शुभम तवसाळकर, कु. सौरभ साळवी आदी उपस्थित होते.