जॉन फिलीप; या खेळाडूंच्या सन्मानासाठी स्पर्धेचे आयोजन
गुहागर, ता. 31 : कबड्डी हा कोकणच्या मातीतील खेळ आहे. Kabaddi identity of Konkan. या खेळाचा सन्मान व्हावा म्हणून आर्थिक संकट असतानाही आरजीपीपीएलने सर्वांच्या सहकार्यातून ही स्पर्धा आयोजीत केली. असे प्रतिपादन आरजीपीपीएलचे उपप्रबंधक (मनुष्यबळ) जॉन फिलीप यांनी केले.


आरजीपीपीएल समोर सध्या आर्थिक संकट आहे. अशावेळी एवढी मोठी स्पर्धा कंपनी व्यवस्थापनाने का आयोजीत केली. असा प्रश्र्न काहीजणांनी उपस्थित केला होता. या प्रश्र्नाला अधिकृत उत्तर देण्याचे कंपनी व्यवस्थापनाने टाळले होते. मात्र जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान बोलताना जॉन फिलीप यांनी या मुद्द्याला स्पर्श केला. ते स्वत: बास्केटबॉलचे राष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय पंच तसेच भारतीय क्रिक्रेट नियामक मंडळ मान्यताप्राप्त राष्ट्रीय पंच आहेत. जॉन फिलीप म्हणाले की, कबड्डी हा कोकणाच्या मातीतील खेळ आहे. (Kabaddi identity of Konkan) कोकणातील प्रकल्प म्हणून इथल्या मातीतील खेळाला, खेळाडूंना प्रोत्साहन देणे हे आमचेही दायित्व आहे. म्हणूनच वीज प्रकल्पासमोर आर्थिक संकट असतानाही आरजीपीपीएलने या स्पर्धेचे आयोजन केले.


त्यासाठी कंपनीशी जोडल्या गेलेल्या युटीलीटी पॉवरटेक लिमिटेड, इंडियन कॉफी हाऊस, एल ॲण्ड टी, कोकण एलएनजी, एच एनर्जी अशा विविध कंपन्यांचे सहकार्य आम्हाला मिळाले. काटकसर करणे हा कंपनीचा स्थायी स्वभाव बनला आहे. त्यामुळे स्पर्धेच्या व्यवस्थांचे काम कंपनीतील विविध विभागांनी सांभाळले. मैदान आणि गॅलरी उभारण्याचे काम कंपनीच्या सिव्हील आणि मेकॅनिकल मेंटेनन्स विभागाने केले. इलेक्ट्रीकल विभागाने स्पर्धेशी संबंधित इलेक्ट्रीकलची कामे केली. कंपनीमधील अनेक अधिकारी, कर्मचारी विविध खेळांशी संबधित आहेत. त्यांनी जिल्हा कबड्डी असोसिएशनशी समन्वय साधून स्पर्धेचे नियोजन केले. सीआयएसएफ, टाऊनशीप सुरक्षारक्षक यांच्यासह अन्य विभागातील कर्मचाऱ्यांनी स्वयंसेवकाची भूमिका पार पडली. अशाप्रकारे प्रकल्पांतर्गत व्यवस्था उभ्या राहील्याने मोठी बचत करता आली.
स्पर्धेच्या निकालाची बातमी वाचा : Chiplun wins RGPPL tournament
या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील खेळाडूंना एक व्यासपीठ मिळाले. जिल्हा असोसिएशनचे पदाधिकारी, निरिक्षक तीन्ही दिवस उपस्थित होते. त्यांच्यासमोर आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली. कंपनी परिसरातील कबड्डीप्रेमींना खेळाचा आनंद लुटता आला. त्यामुळे एक संकट समोर असतानाही उत्तम आयोजन, नियोजनातून स्पर्धेमागे असलेला हेतू साध्य करता आला. Kabaddi identity of Konkan