जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचे पत्रकारांना आवाहन
रत्नागिरी : जिल्ह्याचे वातावरण समृद्ध आहे आणि येथील पत्रकारिता(Journalism) सकारात्मक आहे. आता जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरण्याकरिता शासनाच्या योजना खेडोपाडी पोहोचण्यासाठी लेखणी हातात घ्यावी. पायाभूत विकासासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील(Collector Dr. B. N. Patil) यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे(Ratnagiri District Marathi Press Association) पत्रकार दिन(Journalist Day) कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात(Collector’s Office) झालेल्या या कार्यक्रमात सुरवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर(Darpankar Balshastri Jambhekar) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रेय महाडिक(Founder President Dattatreya Mahadik) यांना पत्रकार पै. रशिदभाई साखरकर स्मृती पुरस्कार(Journalist Pai. Rashidbhai Sakharkar Smriti Award), टीव्ही ९(TV 9) चे पत्रकार मनोज लेले(Journalist Manoj Lele) यांना पत्रकार गौरव पुरस्कार(Journalist Pride Award) आणि टीव्ही ९ चे कॅमेरामन अनिकेत होलम(Cameraman Aniket Holam) यांना व्हिडिओ जर्नालिस्ट गौरव पुरस्कार(Video Journalist Pride Award) देण्यात आला. महिला पत्रकार सौ. कोमल कुलकर्णी- कळंबटे(Women Journalist Komal Kulkarni- Kalambate) यांना पत्रकार भूषण पुरस्काराने(Journalist Bhushan Award) सन्मानित करण्यात आले. कोविड रुग्णालयाचे प्रमुख डॉ. विकास कुमरे(The head of Kovid Hospital, Dr. Vikas Kumare) यांना पत्रकारमित्र सन्मान पुरस्कार(Journalist Friend Honor Award) यांना जाहीर(Announced) झाला. परंतु ते काही कारणाने उपस्थित राहू शकले नाहीत. या वेळी व्यासपीठावर वाहतूक पोलिस निरीक्षक शिरीष सासणे(Traffic Police Inspector Shirish Sasane), जिल्हा मराठी पत्रकार संघाचे(District Marathi Press Association) अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, सचिव राजेश कळंबटे उपस्थित होते. मानपत्रांचे वाचन उपाध्यक्ष मेहरून नाकाडे, राजेश चव्हाण, राकेश गुडेकर, विजय पाडावे यांनी केली. या वेळी अनघा निकम यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी उपाध्यक्ष नीलेश जगताप यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले की, या कार्यक्रमातून आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात सकारात्मक पत्रकारिता पाहायला मिळते. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. मी पाचवी, सहावीत होतो, तेव्हा गावकरी व देशदूत(Villagers and Country Envoy) हे पेपर यायचे. मन घडणे, समाजाचे प्रतिबिंब पाहताना, ध्येय समोर ठेवले तर त्या बातमी, लेखातून कोणीही निष्कर्ष काढत असतो. आपल्या लेखाचा पुढे काय अन्वयार्थ निघणार आहे त्या दृष्टीने विचार करावा. आजच्या वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर चोरी, अपघातांच्या बातम्या असतात. परंतु आजच्या विद्यार्थ्यांसमोर आपण विकासात्मक बातम्या दिल्या पाहिजेत. विद्यार्थी गोंधळलेले आहेत. नवीन पत्रकारांनाही योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. समाजाची जडणघडण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. आदर्श कोण आहेत, याचा विचार करावा. जिल्ह्याचे वातावरण समृद्ध आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार हा देशाचा मानबिंदू ठरू शकतो. वैचारिक, सामाजिक सुधारणांसाठी योगदान दिले. विकासासाठी मानक तयार करावे. चुका दाखवा म्हणजे बरोबर चाललोय की चुकीच्या मार्गाने हे कळते. कोणाला राग आला तरी चालेल. चुका दाखवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जिल्ह्यात सकारात्मक पत्रकारिता आहे. नवीन पत्रकारांनाही आदर्शवत वाटावे असे काम उभे केले पाहिजे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. समाजाची जडणघडण होण्याच्या दृष्टीने पत्रकारांनी प्रयत्न करावेत.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले की, शासनच्या समाजातील विविध घटकांसाठीच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार करू शकतात. तसेच नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवले पाहिजे. माणूस आत्मकेंद्रित होत चालला आहे. फक्त माणूसच पृथ्वीवर राहू शकतो. परंतु आपण अन्नसाखळीतले(Food chain) घटक आहोत हे विसरलो आहोत. बिबट्या(Leopard) वस्तीत आला असे म्हणतो, पण आपणच त्यांच्या वस्तीत अतिक्रम केले आहे. सध्या माणूस फक्त पैसे किती वाढले ते बघतो. परंतु राष्ट्रीय संसाधनांच्या(National Resources) नाशामुळे उद्योग बंद होत आहेत. त्यामुळे नैसर्गिक स्रोत(Natural resources) योग्य रितीने वापरले नाहीत तर भौतिक विकास (Physical development) होऊ शकत नाही, हे विचार सोप्या भाषेत मांडावेत. तरच शाश्वत विकासाचा(Sustainable development) पाया भक्कम राहील. जागरुकता(Awareness) व्हायला हवी. तात्पुरती मोहीम न राहता चळवळ झाली पाहिजे. शासनाची योजना म्हटली की बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. पण शासन म्हणजे आपणच आहोत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होता कामा नये, ही गोष्ट पत्रकारितेतून मांडावी.
पुरस्कारप्राप्त पत्रकार मनोज लेले यांनी मनोगत व्यक्त करून कोणताही अर्ज न करता हा पुरस्कार मिळाल्याने आनंद झालाय. हा घरचा पुरस्कार(Awards) आहे आणि यात माझ्या कुटुंबीय व सहकाऱ्यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. दत्तात्रेय महाडिक यांनीही महावितरण(MSEDCL) मधील सेवानिवृत्तीनंतर साप्ताहिक, वृत्तवाहिनीमध्ये(News channel) काम करताना अनेक गोष्टी शिकता आल्याचे नमूद केले. तसेच युवा सहकाऱ्यांच्या मदतीमुळेच अजूनही सक्रिय राहू शकलो. युवा पत्रकारांची संघटन शक्ती महत्त्वाची असल्याचे नमूद केले.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अलिमियॉं काझी यांनी रोखठोक विचार मांडताना पत्रकारांच्या लेखणीची धार अधिक धारदार करावी, असे आवाहन पत्रकारांना केले. समाजातील समस्या न घाबरता मांडाव्यात. सत्य समोर आले पाहिजे याकरिता आपण रोखठोक लिहिले पाहिजे, याचा पुनरुच्चार केला. पुरस्कार विजेत्यांना सन्मानपत्र, पुष्परोपटे आणि विजय फळणीकर यांचे पराजय नव्हे विजय या पुस्तकाची प्रत देऊ गौरवण्यात आले. कार्यक्रमाला माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळ्ये, पत्रकार अरविंद कोकजे, अजित आंबेकर, किशोर मोरे, कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई, सतीश कामत, शोभना कांबळे, राजेश मयेकर, सुनील चव्हाण, संदीप तावडे, यांच्यासमवेत रत्नागिरीतील बहुसंख्य पत्रकार आवर्जून उपस्थित होते. कोरोना नियमांचे पालन करीत हा छोटेखानी कार्यक्रम झाला. याच कार्यक्रमात पत्रकार विजय बासुतकर यांच्या भूमी न्यूज(Bhoomi News) या वेबपोर्टलचा(Webportal) शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केला. गेली पंचवीस वर्षे पत्रकारितेमध्ये कार्यरत बासुदकर यांना जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.