गुहागर : कोरोनोत्तर काळात जवळपास दीड वर्षानंतर शाळा सुरू झालेल्या आहेत. शाळा कधी सुरू होणार, याची जशी विद्यार्थ्यांना उत्सुकता होती तशी पालक आणि शिक्षकांनाही होती. त्यामुळे आता शाळा सुरू झाल्यानंतर सर्व स्तरात उत्साहाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शाळेत विविध पद्धतीने विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.
In the post-Corona period, schools have been started for almost after a year and a half. Parents and teachers were just as anxious for the students as for when the school would start. So now that the school has started, there is an atmosphere of excitement at all levels. Against this backdrop, student admission ceremonies are being celebrated in various ways in many schools.
जिल्हा परिषद जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. 1 ही शहरातील सर्वात जास्त पटसंख्या असलेली, तसेच विविध उपक्रम राबवण्यात आग्रेसर असलेली शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेत नगरपंचायत गुहागरच्या शिक्षण समितीमार्फत विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गातील विध्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, शिक्षणिक साहित्य व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात नगराध्यक्ष राजेश बेंडल, शिक्षण समिती अध्यक्षा सुजाता बागकर, नगरसेविका स्नेहा भागडे, मृणाल गोयथळे यांनी विध्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या हिरवे, पदवीधर शिक्षक चंद्रकांत झगडे, अमोल धुमाळ, ईश्वर हलगरे आदी शिक्षक उपस्थित होते.