देवभूमी अशी ओळख असणाऱ्या हिमाचल प्रदेशातील जिंद (पूर्वीचे नाव जयंतापुरी) या जिल्ह्याच्या ठिकाणी 51 शक्तिपीठापैकी जयंती देवी हे एक शक्तिपीठ आहे. कांगरा किल्ल्यापासून 3.5 कि.मी. अंतरावर एका डोंगरावर हे स्थान आहे. जयंती देवीच्या मंदीराकडे जाण्यासाठी घनदाट जंगलात पाखाडी स्वरुपात रस्ता आहे. 35 ते 40 मिनिटे पदयात्रा केल्यानंतर आपण जयंती देवी शक्तिपीठाचे मंदिरात पोचतो. हे मंदिर पांडवांनी बांधल्याचे सांगतात. इथे दरवर्षी भिष्मपंचक या नावाने जत्रा भरते. त्याच संबध महाभारतातील पितामह भिष्म यांनी युद्धानंतर बाणांच्या टोकावर पडलेल्या अवस्थेत पाच दिवस उपदेश केला. या कथेशी आहे. या देवीला जय देणारी म्हणून ओळखले जाते.
जयंती देवी संदर्भात एक अख्यायिका आहे. उत्तर भारतात हथनौर (सध्याचे पंजाब राज्यातील चंदीगड, ) नामक एक राज्य होते. तिथल्या राजाचे लग्न कांगरा राजाच्या मुलीबरोबर झाले. ती मुलगी जयंती देवीची भक्त होती. लग्न झाल्यावर आपल्या देवीचे दर्शन मिळणार नाही या कल्पनेने ती चिंतेत पडली. त्यावेळी जयंती देवीने तिला दृष्टांत देवून सांगितले की, तु काळजी करू नकोस. तुझे लग्न झाल्यावर जेव्हा मेणा उचलायची वेळ येईल तेव्हा प्रथम माझा मेणा उचलायला सांग. तु जिथे जाशील तिथे मी तुझ्यासोबत येईल. राजकुमारीचे लग्न झाल्यावर मेणा उचलायची वेळ आली तेव्हा राजकुमारीचा मेणा जड झाला. तेव्हा या दृष्टांताची आठवण राजकुमारीला झाली. हा वृत्तांत तिने जेष्ठांना सांगून जयंती देवीचा मेणा तयार करण्यास सांगितले. तो मेणा उचल्यावर राजकुमारीचा मेणाही विनासायस उचलला गेला. त्यामुळे हथनौरच्या राजाने आपल्या राजधानीजवळील शिवालीक पर्वतावर जयंती देवीचे भव्य मंदिर बांधले. तेव्हा पासून त्या परिसरला जयंती माँ हिल्स म्हणून ओळखले जाते.
– सौ. वेदा खरे, गुहागर
राष्ट्र सेविका समितिचे आराध्य दैवत – श्री अष्टभूजा देवी
सर्वसामान्य व्यक्तीला अमूर्त कल्पना लक्षात येत नाहीत. त्यामुळे प्रत्येक कल्पनेला मूर्तस्वरुप देवून ते प्रतिक स्वरुपात सर्वांसमोर मांडणे ही भारतीय संस्कृति आहे. राष्ट्र सेविका समितिने स्त्रीयांमध्ये असलेले गुण, तिची सुप्त इच्छाशक्ति, कार्यरत व्हावी यासाठी १९५० अष्टभूजा देवीचे प्रतिक सेविकांसमोर ठेवले. स्त्रीमध्ये प्रेरक, तारक व मारक अशा तीन शक्ती असतात. अष्टभूजा देवीच्या हातातील कमळ, गीता, स्मरणी प्रेरणा शक्तिचे प्रतिक आहेत. तर तारक शक्तिचे प्रतिक वरदहस्त आहे. तर त्रिशुळ, खङग हे मारक शक्तिचे प्रतिक आहे. अशाप्रकारे तीनही शक्ती अष्टभूजांमध्ये एकवटलेल्या आहेत. देवी अष्टभुजेला आठ हात आहेत. हे आठ हात स्त्रीयाच अष्टावधानी असणं सूचवात. एकाचवेळी तिचं लक्ष अनेक ठिकाणी असतं. ती जागृत असते. सतत क्रियाशील असते. परिवाराचा विचार करत असते. आपणही सर्व गृहिणी आधुनिक अष्टभूजाधारी सेविकाच आहोत.