गुहागर : कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कधीतरी बांधावर जावे, ही नेहमीचीच ओरड असताना, गुहागर पंचायतीच्या सभापती सौ. पुर्वी निमुणकर, सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्यासह तालुका कृषी व पंचायत समिती कृषी विभागाचे सर्व अधिकारी भात लावणीमध्ये सहभाग घेत कृषी दिन साजरा केला.
While it is a common cry that the employees of the agriculture department should go to the bund of the farm sometime, the chairperson of Guhagar Panchayat, Mrs. Purvi Nimunkar, Assistant Group Development Officer and all the officers of Taluka Agriculture and Panchayat Samiti Agriculture Department celebrated Agriculture Day by participating in paddy planting.
गुहागर तालुक्यातील शीर येथे तालुक्याचा कार्यक्रम घेण्यात आला. महाराष्ट्राच्या हरीत क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री के. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै हा दिवस महाराष्ट्र कृषीदिन साजरा केला जातो. याप्रमाणे गुहागर तालुक्यातील शीर येथील शांताराम ठोंबरे यांच्या शेतावर चारसुत्री भात लावणीचा कार्यक्रम घेण्यात आला. सभापती सौ. पुर्वी निमुणकर, उपसभापती सिताराम ठोंबरे यांच्या हस्ते कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे शेताच्या बांधावरच पुष्पहार घालूना पुजन करण्यात आले. त्यानंतर संकरीत चार सुत्री भात लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये सभापती पुर्बी निमुणकर, उपसभापती सिताराम ठोंबरे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, तालुका कृषी अधिकारी भक्ती यादव, पंचायत समिती कृषी अधिकारी भरत चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी भीमाशंकर कोळी, ग्रामसेवक महेंद्र निमकर, कृषी विस्तार अधिकारी सर्जेराव कांबळे, राजकुमार धायगुडे तसेच कृषी सहाय्यक, शेतकरी यांचा सामावेश होता.