गुहागर : केंद्र शासनाच्या दिव्यांग लाभार्थी(Divyang beneficiaries) व ज्येष्ठ नागरिकांसाठी(Senior Citizens) कृत्रिम अवयव(Prostheses) व सहाय्यभूत साधनाचे(Assisted tools) मोफत वाटप करण्यासाठी तपासणी शिबिरे(Inspection camp) घेण्याचे रत्नागिरी जि. प.(Z.P) ने निश्चित केले असून दि. ५ व ६ जानेवारी रोजी हे शिबीर (camp) गुहागर तालुक्यासाठी पाटपन्हाळे हायस्कूल(Patpanhale High School) येथे आयोजित करण्यात आले आहे.
केंद्र शासनाने(Central government) नियुक्त केलेली ‘भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर’(alimco) ही संस्था या तपासणी शिबिरात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तपासणी करणार असल्याने सर्व लाभार्थ्यांनी त्यासाठी ऑनलाईन नोंदणी(Online registration) करावयाची आहे. यासाठी दिव्यांग व्यक्तीचे ४० टक्क्यांवरील वैद्यकीय प्रमाणपत्र(Medical certificate), उत्पन्नाचा दाखला(income certificate), आधारकार्ड(Aadhaar card), मतदान कार्ड(Voting card), पासपोर्ट साईज २ फोटो, वार्षिक उत्पन्न १,८०,००० असल्यास मोफत उपकरण असे विविध दाखले लाभार्थ्यांकडे असणे आवश्यक आहे.
या योजनेतून लाभार्थ्यांसाठी कॅलिपर्स(Calipers), व्हीलचेअर(Wheelchair), कुबड्या(Crutches), एलबो स्ट्रेचर(Elbow stretcher), क्रेप्रेस, वॉकिंग स्टिक(Creepress, walking stick), सेरेब्रेल(Cerebral), पालशीसाठी सी.पी. चेअर(For palsy C.P. Chair), अंधांसाठी डेलीप्लेयर(DailyPlayer for the Blind), स्मार्टफोन(Smartphone), स्मार्ट कॅम(Smart cam), ब्रेन क्रेम, ब्रेल स्लेट(Braille slate), ब्रेल किट(Braille kit), कर्णबधिरांसाठी श्रवण यंत्र(Hearing aids for the deaf), १८ वर्षाखालील मतिमंदांसाठी एमएस आयइडी किट, कुष्ठरोग बाधितांसाठी एडीएल किट/एडीएल फोन, कृत्रिम अवयवांमध्ये हात व पाय तपासणे यानुसार नोंदणी होणार आहे. तर ६० वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकर(Walker), वॉकिंग स्टिक(walking stick), ट्रायपॉड(tripod) इत्यादी आवश्यकतेनुसार तपासणी करण्यात येणार आहे.