मनसे तर्फे तहसीलदारांना निवेदन
गुहागर : गुहागर तालुक्यातील निगुंडळ गावातील शिधापत्रक धारकांना रास्त दरातील धान्य निकृष्ट दर्जाचे येत आहे. अशा प्रकारच्या धान्य पुरवठयामुळे नागरिकांच्या आरोग्यास हानी होऊ शकते, हे लक्षात घेऊन गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार प्रतिभा वराळे यांना निवेदन देण्यात आले.
The ration card holders of Nigundal village in Guhagar taluka are getting substandard foodgrains at reasonable prices. This type of grain supply can harm the health of the citizens,With this in mind, a statement was given to Tehsildar Pratibha Warale on behalf of Guhagar Taluka Maharashtra Navnirman Sena.
निगुंडळ गावातील धान्य दुकानावर निकृष्ठ दर्जाचे धान्य नागरिकांना पुरवठा होत असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार मनसे तालुकाध्यक्ष विनोद जाणवळकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अंजनवेल विभाग अध्यक्ष तेजस पोफळे, उपविभाग अध्यक्ष स्वप्निल कांबळे, सुशांत कोंलबेकर, नितिन कारकर, आदित्य मुकनाक, तुषार शिरकर, सागर कोळंबेकर, अमित कोंळंबेकर, सौरभ नबैकर, रुपेश घवाळे असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.