गुहागर : कलेचा वसा लाभलेल्या आणि कलेचं माहेरघर म्हणून संबोधलेल्या जाणाऱ्या पवित्र कोकण भूमीत आजवर अनेक कलारत्न नावारूपाला येत आहेत. कोकणच्या मायभूमीत कानकोपऱ्यात मराठी रंगभूमीची अतूट नाळ जोडलेली पाहायला मिळत आहे. प्रत्येक जिल्हात रंगभूमीच्या प्रेमासाठी कलाकार जगत आले आहेत. असाच एक हुरहुन्नर कलाकार म्हणजेच गुहागर तालुक्यातील पेवे पारदळेवाडीतील केतन टाणकर.
In the Mayabhumi of Konkan, one can see the inseparable umbilical cord of Marathi theater. Artists have been living in every district for the love of theater. One such artist is Ketan Tankar from Peve Pardalewadi in Guhagar taluka.
रंगभूमी गाजवणारा कलाकार अवलिया गाव पातळीवर नाट्यक्षेत्रात काम करता करता त्याची मुंबईतल्या नाट्यमंडळानां तो आपसूकच जोडला गेला. तसेंच रंग ऊर्जा दंगा आर्टस् मुंबईच्या या लोकप्रिय नाट्यसंस्थेतून तो विविध व्यक्तिरेखा साकारत केवळ निव्वळ मनोरंजन करत असतो. त्यांच्या अभिनय कौशल्यातूनमुळे तो रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहे. नुकतेच केतनने कलर्स मराठी वरील एक मालिका म्हणजे “जय जय स्वामी समर्थ” या मालिकेमध्ये पदार्पण केले आहे.
काही दिवसापूर्वी सुरु झालेली ही मालिका सध्या लोकप्रियेतेच्या शिखरावर आहे. ही मालिका श्री स्वामी समर्थ महारांज्याच्या जीवनावर आधारित असून महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भुत आणि अचिंबीत करणाऱ्या आहेत, याची प्रचिलीत होते. रुपेरी पडद्यावर काम करणायची संधी प्रथमच केतनला मिळाली असे त्यांनी सांगितले. या मालिकेमध्ये केतने गावाकऱ्याची भूमिका निभावली आहे. केतनला प्रथमच टीव्ही सिरीयल मध्ये पाहून पंचक्रोशीतील अनेकांकडून शाबासकी मिळत आहे. नाट्यक्षेत्रातून काम करत इथवर आलोय तर पुढे ही असाच चालत राहीन असं केतन म्हणाला. नाट्यकानमधून केतनने अभिनयाचे धडे गिरवत रंगमांच्यावर अभिनयची बाजू भक्कम करत असताना तो कॉमेडीची धुरा सांभाळत रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेला आहे. अभिनय कोणता ही असो तो सहज पणे खांद्यावर पेलत रंगभूमी गाजवून सोडणारा विनोदवीर कलाकार. त्याच्या या कला कौशल्याची सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.