छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर केली जोरदार घोषणाबाजी
गुहागर : क्ष्रत्रिय ज्ञाती मराठा समाज सलग्न क्षत्रिय मराठा युवा संघाच्या वतीने कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणा-या समाज कंठकांचा जाहिर निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, कर्नाटक येथे महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणा-यांचा निषेध असो, अशा पद्धतीने जोरदार घोषणाबाजी करत मराठा समाजातर्फे निषेध करण्यात आला. यावेळी तहसीलदार प्रतिभा वराळे यांना निवेदन देण्यात आले.
On behalf of Kshatriya Dnyati Maratha Yuva Sangh affiliated to Kshatriya Jnati Maratha Samaj, a public protest was organized in the state of Karnataka against the desecration of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai, Jai Bhavani Jai Shivaji, May those who defame the statue of Maharaj in Karnataka protest,In this way, the Maratha community protested loudly.This time A statement was given to Tehsildar Pratibha Warale.
या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचे नाही, तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूरच कणभर अनादर खपवून घेणार नाही. बंगलोरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत अघटित घडले आहे. तरी त्याची कसून चौकशी करायला हवी. गेली अनेक वर्ष कर्नाटकातील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे. आणि तेथील सरकार याकडे डोळेझाक करते आहे, हे दुर्दैवी आहे. कर्नाटकातील शिवरायांची विटंबना होते आणि कुणावर कारवाई न करता उलट मराठी माणसांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो, हे अतिशय निंदनीय आहे व अवमानकारक आहे. कर्नाटक राज्यातील मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट शुल्लक गोष्ट म्हणून डोळेझाक केली आहे तर ही गोष्ट क्षत्रिय मराठा युवा संघ खपवुन घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबून विकृत मनोवृत्तीचा बीमोड करण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता शासनाने त्वरित संबंधीतावर कडक कारवाई करण्याचे सांगावे. या संपूर्ण घटनेचा क्षत्रिय मराठा युवा संघ या संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. क्षत्रिय मराठा युवा संघाच्या वतीने गुहागर शिवाजी चौक येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर गुहागर नाक्या पासून रॅली काढण्यात आली.
यावेळी ऍड. संकेत साळवी, संदेश साळवी, निखिल साळवी, शरद साळवी, नंदकुमार खेतले, निखिल तावडे, महेश साळवी, अमर साळवी, मंदार साळवी, जय शिर्के, सुयोग विचारे, शैलेश पवार, कुणाल देसाई, राहुल शिंदे, सागर देसाई, रोहित विचारे, दिनेश शिंदे आदिसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.