मुंबई : राज्य सरकारकडूनच मराठी विषयाला सापत्न वागणूक दिली जात आहे. अकरावी प्रवेशासाठी असलेल्या CET परीक्षेत मराठी विषयाला डावललं गेलं आहे. यामुळे मराठी माध्यमातील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये नाराजी आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अकरावीचा प्रवेश मूल्यमापन पद्धतीने लागलेला निकाल आणि CET परीक्षा द्वारे दिला जाणार आहे. यातही CET परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. मात्र CET परीक्षेत मराठी विषयलाच डावलण्यात आलं आहे. या परीक्षेत इंग्रजी, गणित, समाजशास्त्र, विज्ञान विषयांचा परीक्षेत समावेश आहे.
म्हणजे मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांना गणित, समाजशास्त्र, विज्ञान विषयाचा पेपर मराठीत लिहिता येईल. मात्र, मराठी भाषेचा विषय नसेल त्याऐवजी इंग्रजी भाषेचा विषय बंधनकारक करण्यात आला आहे. इतर कोणत्याही भाषेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना केवळ इंग्रजी भाषेचाचं पेपर देणं बंधनकारक आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे.