खामशेत कुंभारवाडी येथील घटना
गुहागर : गुहागर तालुक्यातील खामशेत कुंभारवाडी येथे शनिवारी धक्कादायक घटना घडली. शेजारील जंगलात गुरे चरावयास घेऊन गेलेल्या 60 वर्षीय अशोक भिकाजी पालकर यांच्यावर त्यांच्याच रेड्याने हल्ला करून शिंग उजव्या गुडघ्यापासून गुप्त भागापर्यंत घुसून फडल्याने अशोक पालकर यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
A shocking incident took place at Palpene Kumbharwadi in Guhagar taluka on Saturday. Ashok Bhikaji Palkar, 60, who was taking cattle for grazing in a nearby forest, was attacked by his own ox and his horn penetrated from his right knee to his genital area, killing him.
खामशेत कुंभारवाडी मधील अशोक भिकाजी पालकर यांची गुरे आहेत. गेली अनेक वर्षे ते शेतीच्या कामांसाठी गुरांची देखभाल करत असतात. दि. 13 नोव्हेंबर रोजी ते सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास आपली गुरे शेजारील जंगलात चरावयास घेऊन गेले होते. सायंकाळी 7 वाजले तरी वडील घरी गुरे घेऊन न आल्याने मुलगा विनायक पालकर हे जंगलात पहावयास गेले. समोरील प्रकार पाहताच त्यांना धक्का बसला. वडील अशोक पालकर जमीनीवर रक्ताच्या धारोळ्यात पडलेले होते. तर त्यांचा मारकूट रेडा गुरगुरत बाजूला उभा होता. विनायक यांनी रेड्याला तिथून काठीने हाकलून वडिलान शेजारी गेला असता त्यांच्या मारकुटा रेड्याने वडिलांच्या उजव्या गुडघ्यापासून ते गुप्त भागापर्यंत फाडले होते. तसेच उजव्या हाताला शिंग घुसविले होते. अशा जखमी अवस्थेत मुलाने वडिलांना दवाखान्यात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या रेड्याने याआधीही अशोक पालकर यांना दोन वेळा मारण्याचा प्रयत्न केला होता, असे घरच्यांनी सांगितले. दरम्यान, विनायक पालकर यांनी गुहागर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली असून सदरील रेड्याला बांधून ठेवण्यात आले आहे.