बालरोगतज्ञ डॉ शशांक ढेरे यांचा पुढाकार
गुहागर : सध्या संपूर्ण जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच पावसाळी हंगामामुळे अनेक लहान मोठे साथीचे आजार देखील डोके वर काढत आहेत. पावसाळ्यात लहान मुलांमध्ये एन्फ्लूएन्जा (फ्ल्यू) आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत असतो. तसेच कोरोनाची तिसरी लाट देखील तोंडावर आहे. तज्ञांच्या मते तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाचा धोका अधिक उद्भवू शकतो. यासाठीच उपाययोजना आणि मार्गदर्शनसाठी महाराष्ट्र शासनाने पेडियाट्रिक टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. या कोविड १९ पेडियाट्रिक टास्क फोर्सने ६ महिन्याच्या पुढील बालकांना एन्फ्लूएन्जा (फ्ल्यू) लस देण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. या सूचनांची दखल घेऊन गुहागरच्या ढेरे क्लिनिकमध्ये बालरोगतज्ञ डॉ. शशांक ढेरे यांच्या पुढाकाराने इन्फ्ल्युएन्झा ( फ्ल्यू ) लस उपलब्ध करण्यात आली असून तालुक्यातील पालकांनी ही लस आपल्या पाल्यांना द्यावी, असे आवाहन ढेरे क्लिनिकचे डॉ. निलेश ढेरे यांनी केले आहे. फ्ल्यू आजार आणि कोरोनाची सुरुवातीची लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे अशा स्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी एन्फ्लूएन्जा (फ्ल्यू) ची लस घेणे महत्त्वाचे असल्याचे पेडियाट्रिक टास्क फोर्सचे म्हणणे आहे. एन्फ्लूएन्जा (फ्ल्यू) हा एक संसर्गजन्य आजार आहे. याची लक्षणे बऱ्याच प्रमाणात कोरोनाशी मिळतीजुळती आहेत.
In Guhagar’s Dhere Clinic, pediatrician Influenza (flu) vaccine has been made available through the initiative of Dr. Shashank Dhere and parents in the taluka should give this vaccine to their children, appealed of Dhere Clinic Dr.Nilesh Dhere has done it.
एन्फ्लूएन्जा (फ्ल्यू) आजारामध्ये सर्दी, ताप ,पडसे ,खोकला , अंगदुखी अशी लक्षणे दिसतात. तसेच निमोनिया होऊन श्वास घेण्यास देखील त्रास जाणवू लागतो. मात्र एन्फ्लूएन्जा (फ्ल्यू) ची लस घेतल्यास या आजाराचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. तसेच यामुळे लहान बालकांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता देखील फार कमी होते. परिणामी लहान बालके घरी राहून योग्य ते उपचार घेऊन बरे होऊ शकतात. ज्या मुलांना श्वसनासंबंधी आजार आहेत किंवा बालदमा, अस्थमा, हृदयाचे आजार आहेत अशा बालकांनी देखील ही लस घेणे गरजेचे आहे, असे बालरोगतज्ञ डॉ शशांक ढेरे यांनी सांगितले आहे.
इन्फ्ल्युएन्झा ( फ्ल्यू ) लस ढेरे क्लिनिक गुहागर येथे उपलब्ध आहे. सदर लस बालरोगतज्ञ डॉ शशांक ढेरे यांच्या निगराणीखाली देण्यात येणार आहे. दरम्यान, तालुक्यातील अशाप्रकाचा आजार आढळून आलेल्या बालकांवर डॉ. ढेरे यांनी यशस्वी उपचार केले आहेत. तरी तालुक्यातील इच्छुकांनी आपल्या बालकानाही सदरील लसीचा लाभ द्यावा, असे आवाहन ढेरे क्लिनिकचे डॉ निलेश ढेरे यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. शशांक ढेरे ( मो. नं. 7620180618), डॉ. निलेश ढेरे (मो. नं. 9766035900 ) संपर्क साधावा.