गुहागर : रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे जिल्हा संयोजक संतोषी जैतापकर यांच्या माध्यमातुन गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने गुहागर तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये दीपावलीच्या निमित्ताने उटणे वाटप करण्यात आले.
Through Ratnagiri District Bharatiya Janata Party OBC Cell District Coordinator Santoshi Jaitapkar, on behalf of Guhagar Taluka Bharatiya Janata Party, cosmetics were distributed in government offices in Guhagar taluka on the occasion of Diwali.
यामध्ये गुहागर तालुका पंचायत समिती कार्यालयातील सर्व विभाग, तहसील कार्यालय, पोलीस स्थानक, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमिअभिलेख कार्यालय, बँक ऑफ इंडिया कार्यालय, नगरपंचायत कार्यालय, तालुका कृषी विभाग, ग्रामीण रुग्णालय, गुहागर तालुका पत्रकार संघ इत्यादी ठिकाणी गुहागर तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे, तालुका सरचिटणीस सचिन ओक, नगरपंचायत भाजप गटनेते उमेश भोसले, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संजय मालप यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उटणे वाटप करण्यात आले. दीपावलीच्या निमित्ताने श्री. संतोष जैतापकर आणि भारतीय जनता पार्टी तालुका गुहागरर यांनी केलेल्या उटणे वाटपाबद्दल सर्व कर्मचारी बंधू भगिनींनी कृतज्ञता व्यक्त केली.