गुहागर : कोरोना संकटामुळे शासनाच्या सूचनेनुसार गुहागर तालुक्यात दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे विविध समुद्र किनाऱ्यांसह नदी नाल्यांमध्ये गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. च्या जयघोषात मोठ्या भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले.
According to the government’s instructions due to the Corona crisis Ganpati of one and a half days in Guhagar taluka In river nallas along with various beaches of Bappa Ganpati Bappa Morya .. Come early next year ..Immersion was done with great devotion.
कोकणात गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा जातो. गेली दोन वर्षे राज्यात कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्वच सण साधेपणाने साजरे केले जात आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठी जीवितहानी झाली होती. त्यामुळे तिसऱ्या कोरोना लाटेची खबरदारी म्हणून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे शासनाने निर्देश दिले होते. त्यानुसार आज दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे गुहागर खालचापाट, शहरासह असगोली, वरचापाट बाग, आरे, वेलदूर, अंजनवेल, धोपावे, पालशेत, वेळणेश्वर, साखरी आगर, नरवण, तवसाळ या समुद्र किनाऱ्यावर तर काही नागरिकांनी नद्या नाल्यामध्ये बाप्पाचे टाळ मृदुंगाच्या गजरात, तर काहींनी गणपती बाप्पा मोरया…जयघोष करत विसर्जन केले. विसर्जनावेळी काही भागात पावसाने हजेरी लावली होती. कोरोना संकटामुळे गणेश भक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक सद्या पद्धतीने काढावी लागली. तालुक्यात सायंकाळी शांततेत विसर्जन सोहळा पार पडला.